Drugs Dainik Gomantak
महाराष्ट्र

मुंबई विमानतळावर 24 कोटींचे अमली पदार्थ जप्त; कारवाई सुरू

दैनिक गोमन्तक

केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) मुंबई विमानतळावर 24 कोटी रुपयांचे हेरॉइन जप्त केले आहे. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली. या प्रकरणात एका परदेशी व्यक्तीला अटक केली आहे. (Drugs worth Rs 24 crore seized at Mumbai airport auk96)

या व्यक्तीकडून 3.98 किलो हेरॉइन जप्त करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजरपेठेमध्ये या अमली पदार्थची किंमत 24 कोटी रुपये इतकी असल्याची माहिती समोर येत आहे. दक्षिण आफ्रिकन (South Africa) व्यक्तीला एनसीबीने मुंबई विमानतळावर अमली पदार्थांची तस्करी करताना रंगेहाथ पकडल्याची माहिती एनसीबीने दिली, असे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे.

एनसीबीला मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबईच्या (Mumbai) प्रादेशिक अधिकाऱ्यांनी मंगळवारी सायंकाळी मुंबई विमानतळावरुन या व्यक्तीला अटक केली. ही व्यक्ती दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येऊन मुंबईत आली, अशी माहिती पोलिसांनी (Police) दिली. या व्यक्तीकडे अमली पदार्थांच्या एकूण चार पिशव्या सापडल्या. या पिशव्या बॅगमध्ये एका गुप्त कप्प्यामध्ये लपवण्यात आल्या होत्या असे एनसीबीने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. बॅगाचा पुढील भाग तोडल्यानंतर त्यात या पिशव्या सापडल्या. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2024: गोव्याचे आजपासून मिशन सिक्कीम! मागच्या लढतीतील चुका टाळण्याचे आव्हान

BCCI T20 Tournament: गोवा महिला क्रिकेट संघाची दणदणीत कामगिरी! जम्मू-काश्मीरचा आठ विकेट राखून पराभव

Karnataka: मुरुडेश्वर मंदिरात बॉम्बस्फोट करण्याचा कट उधळला, कर्नाटकात सहा दहशतवाद्यांना अटक

CM Pramod Sawant: राष्ट्रीय प्रवासात 'गोवा' महत्त्वाची भूमिका बजावेल! मुख्यमंत्री सावंतांनी व्यक्त केला विश्वास

Sancoale News: क्विनीनगरात तणाव! 'रस्ता' प्रश्नावरून नागरिक आक्रमक'; आमदार वाझ यांची मध्यस्थी

SCROLL FOR NEXT