Devendra Fadnavis Tweet: देवेंद्र फडणवीसांनी ट्वीट करत शरद पवारांवर साधला निशाणा

देवेंद्र फडणवीस यांनी एकामागेएक 14 ट्वीट करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे.
Devendra Fadnavis  and Sharad Pawar
Devendra Fadnavis and Sharad PawarDainik Gomantak
Published on
Updated on

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकापाठोपाठ ट्वीटरवर 14 ट्वीट करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला आहे. कलम 370, इशरत जहाँ, या मुद्द्यांचा संदर्भ देत फडणवीसांनी पवारांवर निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे फडणवीसांनी शेअर केलेल्या ट्विट्ससोबत पवारांच्या वक्तव्यांच्या लिंक्स देखील जोडल्या आहेत.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) एकापाठोपाठ एक 14 ट्विट करत शरद पवारांवर हल्ला बॉल केला आहे. कलम ( Articl) 370 पासून इशरत जहाँ प्रकरणातील वेगवेगळ्या घटनांचा संदर्भ देऊन फडणवीस यांचा शरद पवारांवर (Sharad Pawar) निशाणा साधला आहे.

* फडणवीस यांच्या ट्वीटमध्ये काय...

*आज डॉ. आंबेडकर जयंती असताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कलम 370 ला कडाडून विरोध होता, याचे स्मरण करून घेताना राष्ट्रवादीने याबाबत घेतलेल्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं

* 'काश्मीर फाईल्स' चित्रपटावरून अलीकडेच शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यांचाही उल्लेख केला

* नवाब मलिक यांना अटक होताच, ते मुस्लिम आहेत, म्हणून त्यांचा संबंध दाऊदशी जोडला जातोय, या विधानावर प्रकाश टाकला

* इशरत जहाँ ही निर्दोष होती, याबाबत पवारांनी केलेल्या विधानाचेही स्मरण करून दिले

* एवढेच नाही तर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी इशरतच्या मदतीसाठी केलेल्या प्रयत्नांचाही उल्लेख फडणवीस यांनी ट्विटमध्ये केला आहे.

* संविधानात धर्माच्या आधारावर आरक्षणाला विरोध असताना मुस्लिम आरक्षणासाठी सातत्याने पुढाकार का घेतला..

* अल्पसंख्यक समाज कोणाचाही पराभव करू शकतो, याही विधानाचा उल्लेख ट्विटमध्ये केला आहे.

* 'हिंदू टेरर' हा शब्दप्रयोग सर्वात पहिले कोणी केला, असे विचारत पवारांवर निशाणा साधला

* काश्मीर फाईल्समध्ये काश्मिरी पंडितांच्या वेदनांचे चित्रण असताना असा दुटप्पीपणा का? तुमच्या छद्मी धर्मनिरपेक्षतेच्या अजेंड्याला धक्का बसेल म्हणून?

* 'काश्मीर फाईल्स' चित्रपट कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. मग केवळ अनुनयाच्या हेतूने जातीय विद्वेष पसरविण्याचा प्रयत्न का?

* डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतात हे स्वीकारार्ह नाही!

असे म्हणत शरद पवारांवर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत टीका केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com