Dombivli rape case: 15-year-old gangraped by 29 persons; 21 held Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्रात माणुसकी लाजली; डोंबिवलीत 14 वर्षांच्या मुलीवर 29 जणांचा सामूहिक बलात्कार

डोंबवलीमध्ये (Dombivli) एका 14 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. आणि घटनेच्या आरोपाखाली आता 29 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

राज्यात बलात्काराच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीत. आधी पुणे (Pune Station) नंतर साकीनाका (Sakinaka Rape Case) आणि आता डोंबिवली (Dombivli), पुणे आणि साकीनाका या दोन ठिकाणच्या घटना ताज्या असतानाच आता डोंबिवलीमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. डोंबवलीमध्ये एका 14 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. आणि घटनेच्या आरोपाखाली आता 29 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Dombivli) rape case: 15-year-old gangraped by 29 persons; 21 hel)

याबाबत अधिक माहिती देताना अतिरिक्त पोलिस आयुक्त दत्ता कराळे यांनी या प्रकरणातील 21 लोकांना अटक करण्यात आली आहे तर इतर दोन ताब्यात घेतलेले आरोपी अल्पवयीन असून उर्वरित सहा आरोपींचा पोलीस शोध घेत असलयाचे सांगितले आहे.

मुख्य आरोपी हा पीडितेचा मित्र असल्याचे सांगितले जात आहे ज्याने जानेवारीमध्ये मुलीवर प्रथम बलात्कार केला होता आणि तिचा व्हिडिओही बनवला होता.नंतर, इतर आरोपींनी त्याच व्हिडिओचा वापर करून मुलीला ब्लॅकमेल केले आणि डोंबिवली, बदलापूर, रबाळे आणि मुरबाडसह विविध ठिकाणी तिच्यावर अनेक प्रसंगी बलात्कार करण्यात आला.

याबाबत पीडितेने बुधवारी रात्री पोलिसांकडे तक्रार नोंदवल्यानंतर भारतीय दंड संहिता कलम 376 (बलात्कार) आणि लैंगिक अपराधांपासून मुलींचे संरक्षण (POCSO) कायद्याअंतर्गत सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: तरुणीची अजब ड्रायव्हिंग स्टाईल व्हायरल, व्हिडिओ पाहून नेटीझन्स लोटपोट; म्हणाले, ''ब्रेकअप करुन आली...''

शनिदेवाची वक्रदृष्टी संपली, आता सुरु होणार सुखाचे दिवस! 'या' दोन राशींचे भाग्य अचानक चमकणार; डिसेंबरपर्यंतचा काळ ठरणार खास

Cricketer Passes Away: क्रिडाविश्वात शोककळा! माजी क्रिकेटपटूचे वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी निधन; दिल्लीत सुरू होते उपचार

Stray Dogs Virus: भटक्या कुत्र्यांना 'व्हायरस'ची लागण? कुत्र्यांच्या मृत्यूच्या घटनांत वाढ, डिचोलीत चिंता

Syria Bomb Blast: सीरियात हॉटेलबाहेर भीषण स्फोट! फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष थोडक्यात बचावले, 6 जणांचा मृत्यू VIDEO

SCROLL FOR NEXT