Disha Salian Suicide Case Dainik Gomantak
महाराष्ट्र

Disha Salian Suicide Case: का केली होती दिशा सालियनने आत्महत्या?

आई-बाबांनी आत्महत्येचे कारण स्पष्ट करत मुलीची बदनामी न करण्याचे केले आवाहन

दैनिक गोमन्तक

Disha Salian Suicide Case: दिशा सालियन आत्महत्येप्रकणावरून महाराष्ट्रात राजकारण सुरू आहे. यासंदर्भात आता तिच्या आई-वडिलांनी समोर येऊन तिच्या आत्महत्येबाबत कारण स्पष्ट करत कुणीही यावरून राजकारण करू नये, अशी विनंती केली आहे.

स्वर्गीय अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियन (Disha Salian) हिने 8 जून 2020 ला राहत्या घराच्या बाल्कनीमधून उडी मारून आत्महत्या केली होती. त्यानंतर ही केस बंद करण्यात आली. पण त्यानंतर 14 जूनला ज्यावेळी सुशांत सिंग राजपूतने (Sushant Singh Rajput) आत्महत्या केली त्यावेळी दिशा सालियन आत्महत्येचा मुद्दाही पुन्हा वर आला. यासंदर्भात अनेक गोष्टी बोलल्या जात होत्या.

मात्र आता दिशाच्या आई-बाबांनीच मीडियासमोर येत या प्रकरणावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, 'दिशाच्या आत्महत्येनंतर अजूनही तिच्यावर होत असलेल्या आरोपांमुळे आमच्या मुलीची बदनामी होत आहे. तिने कामाच्या तणावातून आत्महत्या केली. ऑफिसमधील तणावामुळे आणि व्यावसायिक डील होत नसल्याने तिने आत्महत्या केली. तरीदेखील तिच्यावर बलात्कार झाला किंवा अशा अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत. त्यामुळे कोणीही कृपया तिची बदनामी करू नका', असे आवाहन दिशाच्या आईवडिलांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: इस्रायली कारवायांविरोधात आंदोलन! पणजीत 60 नागरिकांवर कारवाई; परवानगी नसल्याने पोलिसांनी रोखले

Goa Mining: खाण खाते खटल्यांच्या जंजाळात! 130 प्रकरणे सुरु; खाणी सुरू करताना अडथळ्यांची शर्यत

Goa Water Supply: '2047 पर्यंत आवश्यक पाण्याची तजवीज 2 वर्षांत करणार', जलसंपदा मंत्री शिरोडकरांचा दावा

Goa Crime: चिंताजनक! गोव्‍यासह देशभरात महिलांवरील अत्‍याचारांत वाढ; NCRBच्या अहवालातून माहिती उघड

Goa Rain: ..लो मैं आ गया! पुन्हा पावसाची वापसी, विजांसह कोसळणार सरी; 2 दिवस यलो अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT