Dhule Crime News: दिवसागणिक गुन्हेगारीमध्ये वाढ होत आहे. आजवर अनेक फसवणुकीच्या घटना आपण पहिल्या आहेत. अशीच एक घटना घडली आहे धुळेमध्ये. लग्नाच्या नावाखाली लोकांकडून पैसे उकळून फसवणूक केल्याचा प्रकार आता उघडकीस आला आहे. धुळ्यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या हा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी या 'बंटी-बबली' ला सापळा रचून पोलिसांच्या (Police) ताब्यात दिले.
सध्या लग्नाळू मुलांसाठी मुलगी हवी म्हणून बहुतांशी पालक मुलाकडचे कुटुंबीय मध्यस्थामार्फत लग्न जुळवण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये मध्यस्थी करणाऱ्यांना दलालीच्या स्वरूपात लाखो रुपये देखील जातात. याचाच फायदा घेत जळगाव जिल्ह्यातील बंटी-बबलीने लग्नाळू मुलांच्या कुटुंबियांना फसवून (Fraud) लाखोंचा गंडा घालण्याचे रॅकेटच सुरू केले होते.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन हेमाताई हेमाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बंटी-बबलीचा शोध सुरू केला. हे दोघेही जळगावातील असल्याचे समोर आले. या सामाजिक कार्यकर्त्यांनी विवाहासाठी मुलगी हवी असल्याचे सांगत त्यांना मध्यस्थीसाठी धुळ्यात आणले. त्याच वेळी फसवणूक झालेल्या कुटुंबीयांना या कार्यकर्त्यांनी बोलावले होते. फसवणूक करणारे हेच दोघे असल्याचे फसवणूक झालेल्यांनी सांगितले.
धुळे पोलिसांनी त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, या रॅकेटमध्ये आणखी किती जण सामील आहेत, त्यांचा देखील तपास सुरू केला आहे. त्यामुळे लवकरच या जेरबंद करण्यात येईल असे धुळे शहर पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.