राजभवनाशेजारील जलवाहतूक दोन दिवस राहणार बंद

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या गोवा दौऱ्यामुळे बंदर कप्तान विभागाचे आदेश
Ban on inland water movement in goa near Raj Bhavan
Ban on inland water movement in goa near Raj BhavanDainik Gomantak

पणजी : गोव्यातील नद्यांतर्गत सुरु असणारी जलवाहतूक दोन दिवस बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. बंदर कप्तान विभागाकडून याबाबचे आदेश देण्यात आले आहेत. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू गोवा दौऱ्यावर येणार असल्याने ही वाहतूक बंद राहणार आहे. (inland water movement in goa News Updates)

Ban on inland water movement in goa near Raj Bhavan
युक्रेनमध्ये अडकलेली गोमंतकीय विद्यार्थिनी भारतात दाखल

राजभवनाजवळ 500 मीटर अंतराच्या आत 3 आणि 4 मार्च असे दोन दिवस जलवाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. उपराष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हे आदेश जारी करण्यात आले आहेत. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू 3 आणि 4 मार्च दरम्यान गोवा (Goa) दौऱ्यावर असतील. यावेळी ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून जलवाहतुकीवरही निर्बंध (Restrictions) लादण्यात येणार आहेत.

Ban on inland water movement in goa near Raj Bhavan
'लॉरेन्स यांनी सरकारी यंत्रणा हाताशी धरलीय'

अत्यावश्यक सेवेतील जलवाहतुकीला मात्र या दोन्ही दिवशी परवानगी देण्यात आली आहे. असं असलं तरीही बंदर कप्तान विभाग आणि तटरक्षक दलाची करडी नजर राजभवन परिसरावर असणार आहे. आदेशाचं उल्लंघन केल्यास कडक कारवाईचा इशाराही बंदर कप्तान विभागाने दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या म्हापशातील प्रचारसभेवेळीही अशाच प्रकारे जलवाहतुकीवर निर्बंध लादण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com