Sharad Pawar Dainik Gomantak
महाराष्ट्र

''एन्जॉय केला'' देवेंद्र फडणवीसांच्या 14 ट्विट वर शरद पवारांचा सूचक टोला

भाजपने (BJP) आरोपांचा मोर्चा शिवसेनेकडून राष्ट्रवादीकडे वळवला आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील राजकारण मागील दिवसांपासून चांगलंच गाजत आहे. शिवसेना-भाजप एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मात्र आता भाजपने आरोपांचा मोर्चा शिवसेनेकडून राष्ट्रवादीकडे वळवला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकापाठोपाठ एक 14 ट्विट करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर गुरुवारी हल्लाबोल केला. (Devendra Fadnavis tweeted 14 times against you how did you feel Sharad Pawar said It was fun)

देशातील एवढ्या मोठ्या नेत्याला सेक्यूलर वोट गमावण्याच्या भीतीने गुपचूप मंदिरात जावं लागत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला होता. उघडपणे मंदिरात जाता येत नाही. देवेंद्र फडणवीसांनी शरद पवार यांच्यावर जातीवादी राजकारण केल्याचा आरोप केला होता. शरद पवारांनी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्यास विरोध केला होता, असे ट्विटही केले होते. या सगळ्या आरोपांवर आज ( April 15, Friday) शरद पवारांनी उत्तर दिलं आहे. शरद पवार जळगाव दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटवर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले की, 'मी त्या ट्विटचा आनंद घेत आहे.' जातीवादी राजकारण केल्याचा आरोप करत पवारांनी आपल्या पक्षाशी संबंधित आदिवासी नेत्यांच्या नावांची लांबलचक यादीच दिली. ते म्हणाले की, ''राष्ट्रवादीची स्थापना झाली तेव्हा छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) पक्षाचे पहिले अध्यक्ष झाले. ते मागास समाजातील आहेत. त्यांच्यानंतर मधुकर पिचड, अरुण गुजराथी आणि सुनील तटकरे हे पक्षाचे अध्यक्ष झाले. म्हणजेच राष्ट्रवादीत सर्व जातीधर्माच्या लोकांचा सहभाग राहिला आहे. राष्ट्रवादी हा केवळ एका विशिष्ट जातीचा पक्ष नाही याचा हा पुरावा आहे. वास्तविक देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोलण्यासारखे काही नाही, त्यामुळे ते असे आरोप करत आहेत.''

केंद्रातील मोदी सरकारला कोणत्याही मार्गाने महाराष्ट्राची सत्ता बळकावायची आहे

शरद पवार म्हणाले पुढे की, ''सध्या देशातील दोन राज्यांमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांचा सर्वाधिक वापर केला जात आहे. ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे, त्यांना महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालची सत्ता कोणत्याही मार्गाने मिळवायची आहे. मात्र त्यांची आशा पूर्ण झाली नाही, अशा स्थितीत केंद्रातील भाजप सरकारला या दोन राज्यांतील सत्ता बळकावायची आहे. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाराष्ट्रातील नेत्यांवर छापे टाकले जात आहेत.''

राज ठाकरेंनी हिंदुत्वाची वाट धरली, शरद पवार म्हणाले

उद्या पुण्यात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत सामूहिक हनुमान चालिसाच्या पठणाचा कार्यक्रम आहे. पुण्यातील पोस्टरमध्ये राज ठाकरेंना (Raj Thackeray) 'हिंदू जननायक' म्हणून दाखवण्यात आले आहे. याबाबत शरद पवार यांचा उल्लेख केला असता, शरद पवार म्हणाले, ''राज ठाकरे हिंदुत्वाच्या वाटेवर चालताना दिसत आहेत. कोणत्याही पक्षाला त्याची स्थिती आणि दिशा निवडण्याचा अधिकार आहे. मात्र याचा त्यांना भविष्यात फायदा होईल की नाही, हे सांगणे कठीण आहे. आजपर्यंत त्यांचा पक्ष लोकांमध्ये स्थान निर्माण करु शकलेला नाही. मात्र त्यांच्याकडून समाजातील एकता आणि बंधुभावाची भावना दुखावणार नाही, अशी अपेक्षा आहे. काहीही झाले तरी महाराष्ट्र एकच राहिला पाहिजे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ganesh Chaturthi: 'दीपवती' नावाने ओळखले जाणारे, गोव्यातील सर्वांत मोठे गणेश मंदिर; 16 व्या शतकाच्या पूर्वार्धात स्थलांतरीत झाले..

Goa Crime: 'इन्स्टा'वरून युवतींची फसवणूक, 5 अजामीन वॉरंट, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा; अट्टल गुन्हेगाराची कोठडीत रवानगी

Goa Crime: सिंगापूरातून दिल्लीत उतरला, विमानतळावरच भामट्याला अटक; शिवोलीतील महिलेला घातला होता 1 कोटींचा गंडा

Goa Film Festival: 'कोकणीतून चित्रपट निर्मितीसाठी पुढे या'! CM सावंतांचे आवाहन; राज्य चित्रपट महोत्सवाचा थाटात समारोप

Goa CM Helpline: तुमच्या तक्रारी थेट CM सावंत ऐकणार, एका फोनवर प्रश्न सुटणार; 24x7 नागरिकांसाठी 'मुख्यमंत्री हेल्पलाईन' सुरू

SCROLL FOR NEXT