किरीट सोमय्यांचा शरद पवारसंह आघाडीच्या अनेक नेत्यांवर घणाघात

ठाकरे सरकारच्या मंत्र्यांचा घोटाळा मगाराष्ट्रासमोर आणणार आहे. खरमाटेची आठ तास इडीची चौकशी झाली.
Kirit Somaiya
Kirit SomaiyaDainik Gomantak
Published on
Updated on

भाजप नेते किरीट सोमैय्या (Kirit Somaiya) यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत शरद पवारांसह अजित पवारांवर घणाघात केला. मी संभ्रमात आहे, पत्रकार परिषद शरद पवारांपासून करायची की अजित पवारांपासून करायची याचा विचार करत आहे. मी दोघांबद्दल बोलणार आहे. मुख्यत्वे मी पुण्यात येण्याचे कारण तीसरे अनिल परब कोण याचा विचार करत आहे. त्याचबरोबर तिसऱ्या अनिल परबांचा शोध घेत आहे.

ठाकरे सरकारच्या मंत्र्यांचा घोटाळा महाराष्ट्रासमोर आणणार आहे. खरमाटेची आठ तास इडीची चौकशी झाली. माझ्या माहितीप्रमाणे पहिली एक्शन येणार. अनिल देशमुख आणि बजरंग खरमाटेचे कनेक्शनचे काही गोपनीय कागदपत्रे आमच्या हाती लागली आहे. अनिल देशमुखांचे रिसॉर्टच्या प्रस्तावाची एक प्रत मला राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. खरटमाटेंच्या 40 कोटींची प्रॉपर्टीची माहिती इडीकडे आहे. म्हणून त्यांच्यावर येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये कारवाई होणार. या रिसॉर्टचे बांधकाम 2017 मध्ये सुरु झाले. मात्र हे अनधिकृत बांधकाम होते. मात्र त्यानंतरही ते मंत्रिमंडळात कसे काय

Kirit Somaiya
कणकवलीत पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध किरीट सोमैया

शरद पवारसाहेब सर्टीफिकेट देतात की, इडी अतिक्रमण करत आहे याचं. भावना गवळीला पाठीशी घालता. अनिल परबांचं रिसॉर्ट हे अनधिकृत आहे. 25 कोटीची कॅश हे राजकारणी विड्रॉल करतात. भावना गवळींच्या घोटाळ्यांचे कागदपत्रे आमच्याकडे आहेत. पवारसाहेबच ठाकरे सरकारला मार्गदर्शन करतात. त्यासाठी त्यांनी कमिटी नेमली. रिसॉर्ट हे अनधिकृत असेल तर अनिल परब मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांनी कसे काय अजून ठेवले आहे. गवळी म्हणतात की, माझे सात कोटी चोरुन घेऊन जातात हे कसे काय शक्य आहे. शरद पवारांना भावना गवळी यांना वाचवायचे असेल तर त्यांनी जरुर सांगावे.

Kirit Somaiya
"बोबडं किरीट सोमय्या तर सारखं उद्धव ठाकरेंच्या संपत्तीचीच चौकशी करा म्हणतंय"

65 कोटीमध्ये कारखान्यांचा लिलाव झाला. सात कोटीची रक्कम भावना गवळी यांच्याकडे आली कशी काय याबद्दल विचारले असता मला जीवे मारण्याची धमकी दिली जाते. जरंडेश्वर कारखाना अवघ्या 65 कोटीमध्ये घेतला. त्यासंबंधीचे व्हल्युएशेन रिपोर्ट नेमका कुठे आहे. माझा प्रश्न अजित पवार आणि शरद पवारांना आहे की, यासाठी तुम्हाला सहकारी संस्था पाहिजे आहेत का. या घोटाळे बाज सरकारला उघड पाडायचे हा आमचा हेतू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com