Devendra Fadanvis Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra Development: फडणवीसांची कमाल! महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलला; विकास आणि राज्यहित बनले प्राथमिकता

Devendra Fadnavis: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात पायाभूत सुविधा, शिक्षण आणि कृषी क्षेत्रात अनेक महत्त्वाची विकासकामे केली आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

Devendra Fadnavis Maharashtra Development

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात पायाभूत सुविधा, शिक्षण आणि कृषी क्षेत्रात अनेक महत्त्वाची विकासकामे केली आहेत. त्यांच्या योजनांनी राज्याचा चेहरामोहराच बदलला सोबत विविध समाजांसाठी नवीन संधी निर्माण केल्या.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकाळात राज्याच्या विकासात भरीव योगदान दिले आहे. त्यांची धोरणे आणि योजनांनी केवळ पायाभूत सुविधाच न्हवे तर कृषी, शिक्षण आणि परदेशी गुंतवणुकीलाही चालना दिली आहे.

फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मेट्रो, कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग असे मोठे प्रकल्प झाल्याने महाराष्ट्राचा विकास नव्या दिशेने गेला. या विकासकामांमुळे राज्याचे कल्याण झाले आहे, असा जनतेचा विश्वास आहे.

शिक्षण आणि रोजगाराच्या संधी

फडणवीस यांनी शैक्षणिक शिष्यवृत्ती आणि रोजगाराच्या संधींना प्रोत्साहन दिले. त्यांच्या प्रयत्नांमुळे वंचित घटकातील लोकांना शासकीय वसतिगृहे आणि निवासाची सोय उपलब्ध झाली. या दिशेने विविध समाजांसाठी विकास मंडळे आणि आर्थिक योजनाही सुरू झाल्या.

कृषी योजना आणि परदेशी गुंतवणूक

फडणवीस यांनी कृषी क्षेत्रात जलयुक्त शिवार, शेततळे अशा अनेक योजना राबविल्या. या उपक्रमांमुळे शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यास मोठी मदत झाली आहे. याशिवाय राज्याच्या आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाची असलेली परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यातही राज्याने यश मिळविले आहे.

मराठा समाजासाठी विशेष प्रयत्न

फडणवीस यांनी मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्या मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले त्यामुळे तरुण पिढीला अधिकाधिक नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या.

सर्वसमावेशक विकासाच्या दिशेने पावले

फडणवीस यांच्या सरकारने विविध समाजाच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन योजना केल्या. घरांची तरतूद, शैक्षणिक प्रोत्साहन आणि आर्थिक विकासाच्या धोरणांमुळे समाजातील विविध घटकांसाठी विकासाचा मार्ग मोकळा झाला. त्यांचे धोरण तात्काळ नफ्यावर नाही तर दीर्घकालीन विकासावर केंद्रित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: फूड कॉम्बिनेशनचा डोक्याला शॉट लावणारा अजब प्रकार व्हायरल, नेटकरीही चक्रावले; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, 'हे ट्राय करु नका...'

IND vs AUS 1st T20: ऑस्ट्रेलियात 'सूर्य' तळपणार, कांगारुंना करणार सळो की पळो, हिटमॅन-किंग कोहलीचा 'तो' रेकॉर्ड निशाण्यावर?

भारताच्या ईशान्येकडील राज्यांवर 'नापाक डोळा'! बांगलादेशात दाखवले आसाम-अरुणाचल; मोहम्मद युनुस यांच्या नकाशा भेटीवरुन नवा वाद

SIR In Goa: विधानसभा निवडणुकीपूर्वी तयारी! दुसऱ्या टप्प्यात गोव्यात होणार 'एसआयआर'; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Women's World Cup 2025: भारतीय महिला संघाला मोठा धक्का! सलामीवीर प्रतीका रावल विश्वचषकातून बाहेर

SCROLL FOR NEXT