पुढील 50 वर्षे भाजपचीच सत्ता राज्यात असेल. त्याचा पाया भाजप कार्यालयाच्या रुपाने रचला गेला आहे. 35 वर्षांत पक्षाने पणजीसह दोन्ही जिल्हा पातळीवर कार्यालये सुरू केली. आता नव्या प्रशस्त कार्यालयाची गरज निर्माण झाल्याने तेही बांधले जात आहे.
19 डिसेंबर 2026 पूर्वी कार्यालयाचे बांधकाम पूर्ण केले जाईल. चार आमदारांपासून सुरू झालेला भाजपचा प्रवास आता विधानसभेत स्पष्ट बहुमतापर्यंत पोचला आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले. ते भाजप मुख्यालय कोनशिला बसविण्याच्या कार्यक्रमात बोलत होते. ताळगाव येथील समाज सभागृहात हा कार्यक्रम झाला.
मुख्यमंत्री म्हणाले, विकसित भारत 2047 च्या धर्तीवर विकसित गोवा 20247 करण्यासाठी भाजपचे सरकार काम करत आहे. विरोधक कोणता तरी मुद्दा हाती घेऊन टीका करतात त्याला कार्यकर्त्यांनीच उत्तर दिले पाहिजे. सरकारने कोणताही गैरव्यवहार केलेला नाही, या उलट मनुष्यबळ विकास आणि पायाभूत सुविधा विकास या क्षेत्रात कधी झाले नव्हते असे काम केले आहे. ही बाब अभिमानाने सांगितली पाहिजे. मनोहर पर्रीकरांचे स्वप्न पक्षाला प्रशस्त कार्यालय हवे, असे होते त्याची पूर्ती आता होत आहे.
भाजप मुख्यालयाच्या कोनशिला बसविण्याच्या कार्यक्रमापूर्वी जे. पी. नड्डा यांच्यासोबत सदानंद शेट तानावडे यांनी चर्चा केली. त्यानंतर नड्डा यांनी आपला व्हिडिओ संदेश नड्डा यांना पाठवला. नड्डा यांनीच देंवेद्र फडणवीस यांचे नावही सुचविले होते.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा कोनशिला बसवण्याच्या कार्यक्रमाला येणार होते. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठक आणि भाजप गाभा समिती बैठकीमुळे ते गोव्यात येऊ शकले नाहीत. त्यांचा व्हिडिओ संदेश कार्यक्रमस्थळी कार्यकर्त्यांना दाखवण्यात आला. संदेशात नड्डा म्हणाले, भाजप आणि गोव्याचे एक वेगळे नाते आहे. कार्यालयाच्या निमित्ताने ते अधिक दृढ होईल. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक 2013 मध्ये गोव्यात झाली होती त्यात कॉंग्रेसचे सरकार उखडून फेकण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर 2014 मध्ये भाजपचे केंद्रात सरकार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सत्तारूढ झाले. देशात 563 कार्यालये उभारली असून आजच्या घडीला 96 कार्यालय इमारतींचे बांधकाम सुरू आहे.
कोण काय म्हणाले...
प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे
पुढील विधानसभा निवडणूक भाजपच्या नव्या कार्यालयातून लढवण्यात येईल. त्यासाठी सर्व व्यवस्था असणारे असे हे सुसज्ज कार्यालय असेल असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी नमूद केले. सावईकर : येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हे मुख्यालयाचे काम पूर्ण होईल व नव्याने निवडून आलेल्या आमदारांची मिरवणूक काढण्याचे आमचे स्वप्न असल्याचे माजी खासदार ॲड नरेंद्र सावईकर यांनी सांगितले.
खासदार विनय तेंडुलकर पक्ष वाढतो, कार्यकर्ते वाढतात तसे प्रशस्त कार्यालयाची गरज असते. भाजपच्या एक लहानशा रोपट्याचे आज वटवृक्ष झाल्याचे समाधान असल्याचे दिगंबर कामत यांनी सांगितले. पूर्वी लहानशा कार्यालयातून भाजपची सुरुवात झाली आज प्रशस्त कार्यालय उभे होणार आहे हे कार्यालय सर्वांना उभारी देणारे ठरणार आहे त्यामुळे समाधान वाटत असल्याचे माजी खासदार विनय तेंडुलकर म्हणाले. श्रीपाद नाईक या कार्यक्रमाला राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा येणार होते परंतु केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमुळे ते येऊ शकले नाहीत त्यामुळे हनुमानासारखे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले आहेत. २०२५ पूर्वी भाजप प्रदेश कार्यालय पूर्ण होईल. भाजपची राज्यात मुहुर्तमेढ रोवल्यानंतर कार्यकर्त्यांच्या परिश्रमावर भाजपचे स्थान मजबूत झाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.