पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. भाजपने चार राज्यांत मोठा विजय नोंदवला आहे. केवळ उत्तर प्रदेशात भाजपला विरोधकांकडून कडवी झुंज मिळाली. तर उत्तराखंड (Uttarakhand), मणिपूर (Manipur) आणि गोव्यातही (Goa) भाजपने (BJP) आपला दबदबा कायम ठेवला आहे.
दरम्यान, गुरुवारी या विजयाबद्दल मतदारांचे आभार व्यक्त करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, 'एकीकडे उत्तर भारतातील हिमालयाच्या कुशीत वसलेले उत्तराखंड राज्य, तर दुसरीकडे उत्तर-मध्य भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले उत्तर प्रदेश राज्य. तर एकीकडे पश्चिमी सागरी किनारा असलेले गोवा, तर दुसरीकडे ईशान्येकडील मणिपूर राज्य, म्हणजेच देशाच्या या चार वेगवेगळ्या राज्यांत भाजपने आपल्या विजयाची सीमा निश्चित केली आहे.' आता भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह एवढा वाढला आहे की, 'उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) ही झांकी आहे, महाराष्ट्र अजून बाकी आहे', असे महाराष्ट्रात (Maharashtra) बोलले जात आहे. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) कडवी प्रतिक्रीया दिली आहे.
तसेच, मुंबईत गोव्यातील विजयाबद्दल भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. या जल्लोषानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेबाबतही निवेदन दिले. त्यानंतर ते विधानसभेकडे रवाना झाले. विधानसभेत पत्रकारांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ''चार राज्यांमध्ये जनतेने मोदीजींवर, भाजपवर विश्वास दाखवला असून त्याबद्दल आम्ही मतदारांचे आभार मानतो. विशेषतः महिला, कष्टकरी जनतेने मोदीजींवर विश्वास ठेवला आहे. आता महाराष्ट्र आणि मुंबईला जुलमी आणि दुष्ट राजवटीतून मुक्त करण्याची वेळ आली आहे. 2024 मध्ये महाराष्ट्रात भाजप पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल.''
महाराष्ट्रातील सरकार पाडण्याच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले...
तत्पूर्वी काल, भाजपच्या मोठ्या विजयानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) महाराष्ट्रातील सरकार पाडण्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'महाराष्ट्रातील भ्रष्ट सरकार आपल्या कृत्यानेच जाईल. भाजप सरकार पाडण्यासाठी कोणतेही प्रयत्न करत नाही. मात्र सरकार पडल्यास पर्यायी सरकार देण्याची आमची पूर्ण तयारी आहे.'
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, हा लढा अजून संपलेला नाही. ही लढाई आता मुंबई महापालिका निवडणुकीत अधिक उत्साहाने लढवली जाणार आहे. हा लढा कोणत्याही पक्षाविरुद्ध नसून, हा लढा महापालिकेतील खोलवर रुजलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध, गैरकारभाराविरुद्ध असणार आहे.''
राऊत यांनी 'मिशन महाराष्ट्र' आणि 'मिशन मुंबई महानगरपालिका'ला संबंधी उत्तर दिले
दुसरीकडे पत्रकारांनी शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना याबाबत विचारले राऊत म्हणाले, 'ये यूपी-गोवा झांकी, महाराष्ट्र बाकी.. हे सगळं आपण आजपासूनच नाही तर पश्चिम बंगालच्या निवडणुकीपासून ऐकत आहोत. मुंबई महापालिकेत पुन्हा भगवाच फडकणार आहे. महाराष्ट्रातील आघाडी सरकारला कुणीही धक्का लावू सकत नाही. जास्तीत जास्त ते काय करतील तर रेड टाकतील. आजवर त्यांनी हेच केले आहे.'
पीएम मोदींनी तपास यंत्रणांबाबत केलेल्या वक्तव्याबाबत राऊत म्हणाले...
यावर संजय राऊत म्हणाले, 'मी अजूनही साशंक आहे. राजकीय सूडबुध्दीने प्रेरित कारवाई केली जात आहे. पश्चिम बंगाल, महाराष्ट्रासह गैर भाजप सरकार असणाऱ्या राज्यात कारवाई सुरु आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे.'
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.