BJP Leader Devendra Fadnavis and Chandrakant Patil  Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्र भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलणार ? देवेंद्र फडणवीसांनी दिले उत्तर

BJP: दिल्ली दौऱ्याचे कारण हे पक्षातील अंतर्गत विषयांसाठी नसुन, केंद्रातील नवीन मंत्र्यांच्या भेटीसाठी सुरु असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

दैनिक गोमन्तक

मुंबई: राज्यातील भारतीय जनता पक्षामध्ये (BJP) संघटनात्मक बदल होण्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सध्या सुरु आहेत. मागच्या काही दिवसांत भाजप नेत्यांचे दिल्ली दौरे वाढले आहेत, हे देखील या चर्चांमागील कारण आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून हे पद काढून घेण्याच्या देखील शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवल्या जाता आहेत. राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील आता याबद्दल एक महत्वाचा खुलासा केला आहे. (Devendra Fadnavis replied to the discussions to change the president of Maharashtra BJP)

राज्यात मागच्या काही दिवसांपासुन भारतीय जनता पक्षात सुरु असलेल्या हालचाली पाहता, येणाऱ्या काळात भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नवा चेहरा पहायला मिळु शकतो अशी चर्चा सुरु होती. मात्र या विषयावर बोलताना भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांनी या विषयाला पुर्णविराम दिल्याचे पहायला मिळाले आहे. दिल्ली दौऱ्याचे कारण हे पक्षातील अंतर्गत विषयांसाठी नसुन, केंद्रातील नवीन मंत्र्यांच्या भेटीसाठी सुरु असल्याचे सांगितले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना, चंद्रकांत पाटील यांचे काम चांगले असुन, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, तसेच या सर्व चर्चांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी कांड्या पिकवू नका, चुकीच्या पद्धतिच्या बातम्या तयार करु नका म्हणत, बातम्या लागल्या तर त्या मी देतो अशी खोचक पद्धातिने टोला लगावला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT