Devendra Fadnavis and Navneet Rana  Dainik Gomantak
महाराष्ट्र

फडणविसांनी घेतली खासदार नवनीत राणांची दवाखान्यात भेट

रविवारी दुपारपर्यंत नवनीत राणा यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमन्तक

भायखळा तुरुंगातून सुटका झाल्यानंतर अपक्ष खासदार नवनीत राणा सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल आहेत. रविवारी दुपारपर्यंत त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. याआधी शनिवारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राणा यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासोबत भाजप आमदार आशिष शेलारही उपस्थित होते. (Devendra Fadnavis meets Navneet Rana in hospital)

दोन्ही नेत्यांनी अमरावतीचे खासदार नवनीत राणा यांच्याशी काही वेळ चर्चा केली. यावेळी नवनीत यांचे पती आमदार रवी राणाही उपस्थित होते. नवनीत राणा यांना सांधेदुखी आणि स्पॉन्डिलायटिससारख्या समस्यांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'बाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी 23 एप्रिल रोजी नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना अटक केली होती. दाम्पत्याची सुटका झाल्यानंतर नवनीत यांना वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, वॉर्डच्या आतून एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती, ज्यामध्ये नवनीत हॉस्पिटलच्या बेडवर झोपल्या होत्या आणि रवी राणा त्यांचे सांत्वन करत होते.

रवी राणा म्हणाले, "गेल्या सहा दिवसांपासून ती तुरुंग अधिकाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्याची विनंती करत होती, मात्र त्यांनी त्याची दखल घेतली नाही."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT