Devendra Fadnavis, Chandrkant Payil In Delhi to meet bjp high command 
महाराष्ट्र

राज्यातील भाजप नेते दिल्ली दरबारी, पक्षसंघटनेत खांदेपालट ?

दिल्लीत चालू असलेल्या या भेटसत्रामागे राज्य कार्यकारणीत फेरबदल होणार हे नक्की मानले जात आहे. (Maharashtra Bjp)

दैनिक गोमन्तक

मागील बऱ्याच दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भाजप नेते (Maharashtra BJP) दिल्ली दरबारी आपली हजेरी लावत आहेत. अगोदर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि आशिष शेलार (Ashish Shelar),नंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Ptil) आणि आज पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर दिल्लीत दाखल झाले आहेत. आणि आता याचमुळे राज्यात भाजपात मोठी खांदेपालट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारण या सगळ्या नेत्यांनी आपली हजेरी पक्षश्रेष्ठींकडे लावली आहे. त्याचबरोबर आज रावसाहेब दानवे यांच्या घरी राज्यातील सर्व भाजपचे खासदार आणि राज्यातील हे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. (Devendra Fadnavis, Chandrkant Payil In Delhi to meet bjp high command)

या अनेक भेटींमुळे राज्यात अनेक चर्चांना देखील उधाण आले आहे, कारण दिल्लीत झालेल्या या भेटी राज्यातील सगळ्या नेत्यांनी स्वतंत्रपणे घेतल्या आहेत अशातच राज्यात प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. पण चंद्रकांत पाटील यांनी मी माझा संपूर्ण कार्यकाळ पूर्ण करेल हे ठामपणे सांगत चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला खरा पण ते स्वतः गेले ४ दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून आहेत. त्यांनी याचे कारण राज्यातील नवीन केंद्रीय मंत्र्यांना भेटणे असे दिले असले तरी महाराष्ट्र भाजपात काहीतरी हालचाली नक्की सुरू असल्याचे राजकीय विश्लेषकांकडून सांगण्यात येत आहे.

वास्तविक पाहता चंद्रकांत पाटील हे 2019 पासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांचा ३ वर्षाचा कार्यकाळ संपत आला असला तरी नजीकच्या काळात या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी होण्याची शक्यता नाही असेही सांगितले जात आहे. तरीही दिल्लीत चालू असलेल्या या भेटसत्रामागे राज्य कार्यकारणीत फेरबदल होणार हे नक्की मानले जात आहे.

दरम्यान राज्यात भाजप आणि मनसे युती होणार असल्याचेही बोलले जात आहे. मुंबईत राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची एक भेटही झाली आहे. याच भेटीनंतर चंद्रकांत पाटील दिल्लीत दाखल झाले आहेत. परंतु याबाबत अधिकृत बोलण्यासाठी राज्यातील भाजपचे कुठलेही नेते तयार नाहीत मनसे आपली भूमिका जोपर्यंत बदलत नाही तो पर्यंत युती शक्य नाही असे सूचक वक्तव्य मात्र सारे नेते करताना दिसत आहेत दरम्यान याबाबत काय निर्णय होईल हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT