75 व्या स्वातंत्र्याच्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत. त्यावेळी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आपल्या पूर्वजांनी केलेले प्रयत्न वाखण्याजोगा होते. आता मी स्वातंत्र्यादिनाच्या आठ दिवस आधीच मी तुम्हाला आवाहन करतो, आपण सर्वांनी मिळून कोरोनाचं हे संकट उलथून टाकू. कोरोनाचं संकट अद्याप कमी झालेलं नाही. कोवीडची दहशत उलथवून टाकली पाहिजे. राज्यात आलेल्या पूरामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूराची परिस्थिती निर्माण झाली. मात्र काळात आपल्या आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने कौतुकास्पद काम केले त्यांनी जवळपास चार लाख ३७ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं. राज्यात दरडी, पूर येण्याचं प्रमाण वाढू लागलं आहे. हिमनग वितळत असल्याने पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होऊ लागली आहे.
तसेच सिक्कीममध्येही पूर, दरडी कोसळण्याचं प्रमाण वाढत आहे. राज्यात आलेल्या पूर परिस्थितीमध्ये त्या त्या जिल्ह्यांचे पालकमंत्री आप आपल्या जिल्ह्यांमध्ये कार्यरत होते. पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी आर्थिक मदत म्हणून 11.50 कोटी निधीची घोषणा करुन निधी वाटपाचे कामही सुरु केले. या काळात 350 निवारा घरामध्ये सुमारे 50 हजार नागरिकांना आणण्यात आले. चिपळूण, सागंली, कोल्हापूर या पूराची स्थिती हाताळण्यासाठी आता काही ठोस पाऊले उचलण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर एनडीआरएफच्या निकषांमध्ये बदल करण्यात आला पाहिजे.
दरम्यान, मराठा आरक्षण देण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला आहे. 50 टक्क्यांची अट शिथील करुन आरक्षाणाचा अधिकार राज्याला देण्यात यावा. सध्या लोकसभेत या आरक्षणासंबंधी चर्चाही सुरु आहे. ज्या ज्या समाजाला आवश्यक आहे त्या समाजाला आम्ही निकषामुसार आरक्षण देऊ.
शिवाय, राज्यातील कोरोनाचं सावट अद्याप कमी झालेलं नाही. गेल्यावर्षी सणांच्या नंतर कोरोनाच्या दोन लाटा आपण अनुभवल्या आहेत. आता कोरोनाच्या लसीचा साठा वाढत आहेत. जोपर्यंत लसीकरण ठराविक मर्यादेपर्यंत होत नाही तोपर्यंत आपणाला आवश्यक पावले उचलावी लागणार आहेत. आयसोलेशनचे बेड सध्या १००० च्या आसपास आहेत. व्हेंटिलेटर 13.50 हजार आहेत. गेल्या वर्षी मार्च मध्ये आपल्याला वाटलं होत कोरोना गेला. मात्र विदर्भात कोरोनाचं प्रमाण वाढलेलं आपल्या पाहण्यात आलं. कोरोनाचा विषाणू देखील अवतार बदलत आहेत.
डेल्टा विषाणू ओळखण्यासाठी मुबंईमध्ये लॅब तयार करण्यात आली आहे. राज्यातील काही जिल्ह्यामध्ये दुकानांच्या वेळा वाढवून दिल्या त्याचबरोबर काही निर्बंध शिथील करण्यात आले होते. मागील काही दिवसांमध्ये सातारा सागंली, कोल्हापूर रत्नागिरी, सिंदुदुर्ग पूराची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढणार असल्याची शक्यता वा़टत होती. सध्या पुणे, सोलापूर, सातारा, रत्नागिरी, बीड या जिल्हांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.
कोरोनामुक्त गावासारखे अनेक कार्यक्रम राज्य सरकारकडून उपक्रम राबविण्यात आले आहेत. लसीकरणाचा वेग आपण वाढवत आहोत. लसींचे दोन डोस घेणाऱ्यांवर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. कार्यालयांच्या वेळात बदल आवश्यक बदल करा. गर्दी टाळा. राज्यातील टास्क फोर्सचा आपण आढावा घेऊन राज्यातील मॉल्स, रेस्टारंट चालू करतो. संयम सोडू नका. जे सरकार सांगत आहे ते तुम्ही ऐकत आहात. म्हणून आज महाराष्ट्र राज्याचं कौतुक जागतिक पातळीवर होत आहे. मुंबई मॉडेलचंही कौतुक होत आहे.
ऑक्सिजनला काही प्रमाणात मर्यादा आहेत. ऑक्सिजनचे प्लांट लालवण्यासाठी काही वेळ खर्च होत आहे. ८० हजारापेक्षा जास्त कोरोना रुग्ण रुग्णालयामध्ये होते. जर राज्यात कोरोनाची तिसरी लाट आली तर लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ शकते. केरळमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. काही प्रमाणात आपण शिथिलता आपण आहोत. 15 ऑगस्टपासून लोकल सेवा मुबंईकरांसाठी सुरु लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना प्रवास करता येणार आहे. त्यासाठी एप लॉंच करण्यात आले आहे. त्यातून आपण प्रवाशांसाठी पास देणार आहोत. टप्प्याटप्याने इतर इतर सुविधा देता येणार आहे. कामांच्या वेळांची वदलल्या तर चोविस तास काम करु शकाल. कर्मचाऱ्यांच्या निवासाची सोय देखील करा. स्वातंत्र दिन आठ दिवसांवर आला आहे. कोरोनामुक्त होण्यासाठी शपथ घेऊ.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.