Devendra Fadanvis Dainik Gomantak
महाराष्ट्र

Devendra Fadanvis: गप्प राहायला आम्ही काही साधु संत नाही! बेईमानीचा बदला घेतला

गोमन्तक डिजिटल टीम

Devendra Fadanvis: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला होता. आम्हाला या बेईमानीचा बदला घ्यायचा होता. गप्प राहायला आम्ही काय साधु, संत नाही. आम्ही बदला घेतला, असे फडणवीस म्हणाले. इंडिया टुडे कॉनक्लेव्ह या कार्यक्रमात शनिवारी ते बोलत होते.

फडणवीस म्हणाले, शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याबाबत काहीही ठरले नव्हते. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय झाला नव्हता. अडीच वर्षांचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला आम्हाला मान्य नव्हता. निवडणुकीपुर्वी उद्धव ठाकरेंनी मला मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला होता. त्या बदल्यात शिवसेनेला जास्त मंत्रीपदे देण्याचा निर्णय झाला होता. पण उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत भाजपच्या पाठित खंजीर खुपसला. मला याचा सुड घ्यायची इच्छा होती. गप्प राहायला आम्ही काही साधु संत नाही. पुढील सर्व निवडणुका एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत एकत्र लढवू. उद्धव ठाकरे यांचे सरकार सकाळ, दुपार, संध्याकाळ खोटे बोलत होते. त्यासाठी त्यांनी माणसे नेमली होती.

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल, या प्रश्नावर ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे आमचे हुकमी एक्के आहेत. त्यांच्या मागे कुणाचाही चेहरा असला तरी चालते. शिंदे-फडणवीस सरकार 2024 मध्ये पुन्हा येईल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.

याच कार्यक्रमात शुक्रवारी बोलताना आदित्य ठाकरे यांनी भाजपने मुख्यमंत्रीपदाबाबतचे वचन पाळले नाही, त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करावी लागली, असे सांगितले होते. तसेच फडणवीस यांची या सरकारमध्ये फजिती झाली आहे, असे वक्तव्य केले होते.

2019 च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेचे एकत्र निवडणूक लढवली होती. पण मुख्यमंत्रीपदावरून त्यांच्यात मतभेद झाले. त्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले होते. त्यानंतर अडीच वर्षानंतर शिंदे गटाने शिवसेनेतून फुटून भाजपसोबत सरकार बनवले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT