Devendra Fadanvis is responsible for drugs business in Mumbai Nawab Malik attack on Fadanvis Dainik Gomantak
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावरूनच ड्रग्सचा धंदा,नवाब मालिकांचा खळबळ जनक आरोप

मुंबईत ड्रग्सचा धंदा करता यावा यासाठीच समीर वानखडे यांना मुंबईत आणण्यात देखील देवेंद्र फडणवीस यांचा मोठा हात होता असा आरोप मालिकांनी केला आहे.

दैनिक गोमन्तक

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत समीर वानखडे (Sameer Wankhede) यांच्या धर्माबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याचबरोबर रामदास आठवले (Ramdas Athawale) आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे उपाध्यक्ष यांच्या आणि वानखेडे परिवाराच्या भेटीवरही आक्षेप नोंदवला आहे. त्याचबरोबर संविधानिक पदावर बसलेली व्यक्ती क्लीन चिट कशी काय देऊ शकते असा सवाल देखील त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर (Arun hAldar) यांना कागदपत्र तपासण्याचा अधिकार नाही असे सांगत त्यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. आणि याच अनुषंगाने या साऱ्या घटनेबद्दल राष्टपतींकडे तक्रार करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. (Devendra Fadanvis is responsible for drugs business in Mumbai Nawab Malik attack on Fadanvis)

त्याचबरोबर काल झालेल्या आठवलेंच्या पत्रकार परिषदेवर उत्तर देताना त्यांनी मी कधीच त्यांच्या पत्नीवर आणि मुलांवर कधीच टीका केले नसल्याचे सांगितले आहे.

नवाब मालिकांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर खळबळ जनक आरोप

नवाब मालिकांनी भाजपचे एक नेते जयदीप राणा हे ड्रगच्या तस्करीबद्दल जेलमध्ये आहेत आणि त्याचे संबंध थेट महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. फडणवीसांच्या कळात त्यांच्या अमृता फडणवीस यांनी नद्यांवर एक गाणे काढलेहोते ज्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील दिसले होते आणि याच गाण्यावर मालिकांनी आक्षेप घेत जयदीप राणा हे या गाण्याचे स्पॉन्सर होते असा हल्लाबोल नवाब मालिकांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. तसेच जयदीप राणे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळचे संबंध असल्याचे देखील त्यांनी केला आहे.

मुंबईत ड्रग्सचा धंदा करता यावा यासाठीच समीर वानखडे यांना मुंबईत आणण्यात देखील देवेंद्र फडणवीस यांचा मोठा हात होता आणि यासोबतच मुंबई आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच ड्रग्सचा धंदा चालू आहे असा खळबळजनक आरोप मालिकांनी केला आहे.

दरम्यान मी प्रसिद्ध केलेलं समीर वानखेडे यांचं बर्थ सर्टिफिकेट खरं आहे त्यांच्या वडिलांचं नाव दाऊदचं, आणि मी माझ्या विधानावर ठाम आहे असा पुर्नउच्चार देखील त्यांनी केला आहे त्याचबरोबर हे कागद मिळवण्यासाठी मी दीड महिने घातले असल्याच देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे.वानखेडे यांनी खोटे कागदपत्र दाखवत नौकरी मिळवली आहे, आणि अशी नोकरी मिळवत त्यांनी एका दलिताचा हक्क हिसकावला असा आरोप देखील त्यांनी केला आहे.तसेच जयदीप राणा आणि फडणवीस यांच्यात जवळचे संबंध असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Damu Naik: काही नेत्यांना ‘प्रसिद्धी स्टंट’ची सवय! दामूंचा भाजप आमदारांना घरचा आहेर; लोबोंवरही निशाणा

Vijai Sardesai: MPA ची दादागिरी, प्रदूषण वाढलेय! विजय सरदेसाईंचा आरोप; ‘जनता दरबार’मध्ये ऐकल्या समस्या

Goa Politics: खरी कुजबुज; पोलिसांचे फोन टॅपिंग?

GST Council: ‘एक देश एक कर’ला बळकटी देणे गरजेचे! दिल्लीत ‘जीएसटी’ परिषदेच्या बैठकीत CM सावंतांचे प्रतिपादन

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

SCROLL FOR NEXT