Konkan Railway Dainik Gomantak
महाराष्ट्र

Konkan Railwayच्या काही गाड्या पुन्हा सुरू करण्याचा निर्णय

कोकण रेल्वे मार्गावर उद्यापासून सोडल्या जाणाऱ्या गाड्यांसाठी आरक्षण प्रक्रियेला सुरवात झाली.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: कोकण रेल्वे (Konkan Railway) मंडळाने काही रेल्वे गाड्या पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रावण मासापासून (Shravan Maas) पारंपारीक सणसमारंभाला (Festivals) सुरवात झाली आहे. कोकणापासून दूर राहणाऱ्या लोकांना मात्र या सणासमारंभाला मुकाव लागतं. पण कोकणातला माणूस जगात कुठेही असला तरी बाप्पांच्या आगमाच्यावेळी घरी येतोच. यावर्षीही बाप्पांचं आगमन साध्या पध्दतीनेच करावं लागणार असलं तरी सणोत्सवाला घरी जाण्याची ओढ मात्र कायमच आहे.

दरम्यान कोकण रेल्वे मंडळाने काही रेल्वे गाड्या पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्‍यात रेल्वे क्र. 01504-01503 रत्नागिरी-दिवा (दररोज), 01501-01502 रत्नागिरी-मडगाव-रत्नागिरी (दररोज, एक्सप्रेस), 01508-01507 मडगाव-सावंतवाडी-मडगाव (दररोज, स्पेशल एक्सप्रेस), 01505-01506 सावंतवाडी-दिवा-सावंतवाडी (दररोज, एक्सप्रेस स्पेशल) सुरू होणार आहे.

पहिल्या क्रमांकाची गाडी (01504) दररोज 7 ते 30 सप्टेंबर या कालावधीसाठी आहे. ही गाडी सकाळी 5.30 वाजता रत्नागिरीहुन सुटेल व दिवा येथे दुपारी 1.25 वाजता पोहोचेल. दुसरी गाडी (01503) दिवाहून संध्याकाळी 3.30 वाजता सुटेल व रात्री 12.20 मिनिटांनी रत्नागिरीला पोहोचेल.

तिसरी गाडी (01501) 6 ते 29 सप्टेंबर या कालावधीत धावेल. रत्नागिरीहून पहाटे 1.40 वाजता ती सुटेल व मडगावला सकाळी 8.50 वा. पोहोचेल. चौथी गाडी (01502) मडगावहुन रात्री 7.40 वाजता सुटेल व रत्नागिरीला रात्री 1वाजता पोहोचेल.

पाचवी गाडी (01508) 7 ते 30 सप्टेंबरदरम्यान धावेल. ती मडगावहून सकाळी 6.25 वाजता सुटेल व सावंतवाडीला त्‍याच सकाळी 8.15 वाजता पोहोचेल. सहावी गाडी 8 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरदरम्यान धावेल. सावंतवाडीहून ही गाडी संध्याकाळी 7 वाजता सुटेल व मडगावी रात्री 9.30 वाजता पोहोचेल. सातवी गाडी (01506) 7 ते 30 सप्टेंबरदरम्यान धावेल. ही गाडी सावंतवाडीहून सकाळी ८.२० वाजता सुटेल व दिवा येथे रात्री 8.20 वाजता पोहोचेल. आठवी गाडी (01505) ही गाडी सकाळी दिवाहून 6.55 वाजता सुटेल व सावंतवाडीला संध्याकाळी 6.55 वाजता पोहोचेल.

दरम्‍यान, चतुर्थीनिमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन ही व्यवस्था करण्‍यात आल्‍याचे कोकण रेल्वे मंडळाचे प्रमुख जनसंपर्क अधिकारी एल. के. वर्मा यांनी कळविले आहे. गणेशोत्सवानिमित्त सावंतवाडी रोड - मुंबई स्पेशल, सावंतवाडी रोड - पनवेल स्पेशल स्पेशल, मडगाव जंक्शन - लोकमान्य टिळक स्पेशल, कुडाळ - लोकमान्य टिळक स्पेशल, कुडाळ- पनवेल स्पेशल, कुडाळ- पनवेल स्पेशल, करमळी - पुणे जंक्शन स्पेशल, मडगाव जंक्शन - पनवेल स्पेशल या कोकण रेल्वे मार्गावर उद्यापासून सोडल्या जाणाऱ्या गाड्यांसाठी आरक्षण प्रक्रियेला 7 ऑगस्‍टपासून सुरवात झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa My Home Scheme: गोमंतकीयांना दिवाळीची भेट! 'माझे घर', मुंडकार हक्कांसह जमीन प्रकरणे दोन महिन्यांत निकाली काढणार

Mohammed Shami Test Cricket Retirement: टीम इंडियाला मोठा धक्का! मोहम्मद शमीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; भावनिक पोस्ट करत म्हणाला, 'माझं एकच स्वप्न होतं...'

Goa Politics: निवडणुकीला 3 महिने बाकी, भाजपचा मोठा निर्णय; संकल्प आमोणकर घेणार मंत्रिपदाची शपथ

Horoscope: शनिवारचे राशिभविष्य! मेष, मिथुनसह 4 राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; नोकरीपासून व्यवसायापर्यंत होणार मोठा आर्थिक फायदा

Five Ideological Lamps of Diwali: दिवाळीत पणत्या लावता, पण मनात हे 5 दिवे प्रज्वलित केलेत का? सकारात्मक आणि आनंदी आयुष्यासाठी खास संदेश!

SCROLL FOR NEXT