Maharashtra Crime News | Monitor Lizard Rape Case  Dainik Gomantak
महाराष्ट्र

किळसवाणे कृत्य! जंगलात जाऊन घोरपडीवर बलात्कार करणारे नराधम वनविभागाच्या ताब्यात

मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओवरून महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दुष्कृत्य करणाऱ्या या आरोपींना वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

दैनिक गोमन्तक

Monitor Lizard Rape Case : महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात काही तरुणांनी एका प्राण्यावर बलात्कार (Assaulted) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ज्या प्राण्यासोबत हे कृत्य करण्यात आले आहे तो प्राणी घोरपड आहे.

याप्रकरणी वनविभागाच्या पथकाने गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे. हे सर्व आरोपी जंगलात शिकारीसाठी गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व आरोपी परवानगीशिवाय जंगलात शिकारीसाठी गेले होते. शिकारी संदीप तुकाराम पवार, मंगेश जनार्दन कामदेकर, अक्षय सुनील कामतेकर अशी या आरोपींची नावे आहेत. (criminals who went to the forest and raped monitor lizard is in the custody of Forest Department)

मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओवरून या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना (Forest Officer) मिळाली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली जंगलात शिकारी शिकारीसाठी गेले होते. संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्यावर कोणत्या कलमांतर्गत गुन्हा दाखल होणार, याबाबत वनविभागाचे अधिकारी वरिष्ठांशी चर्चा करत आहेत. वाघांची संख्या मोजण्यासाठी लावण्यात आलेल्या ट्रॅकर कॅमेऱ्यात हे शिकारी टिपले असता त्यांना ताब्यात घेण्यात आले. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी लावण्यात आलेल्या ट्रॅकर कॅमेऱ्यात 31 मार्च रोजी आरोपी शस्त्रांसह जंगलात जाताना दिसत आहेत.

मोबाईल व्हिडीओ समोर आल्यानंतर अधिकाऱ्यांनी एक विशेष टीम तयार केली असून गुप्त माहितीच्या आधारे रत्नागिरीच्या (Ratnagiri) संगमेश्वर तालुक्यातून या आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून जप्त केलेल्या मोबाईलची वनअधिका-यांनी चौकशी केली असता, आरोपी घोरपडीसोबत बलात्कार करत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला. अधिका-यांनी जेव्हा आरोपीला विचारले की बलात्कारानंतर पीडित प्राणी जिवंत आहे की नाही, तेव्हा आरोपीने कोणतेही उत्तर दिले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs: नशिबाचा तारा चमकणार! सूर्य-गुरुची दुर्मिळ युती 'या' 5 राशींना करणार मालामाल; करिअरमध्ये प्रगती अन् पदोन्नतीचा योग

IND vs SA 4th T20: लखनौत टीम इंडियाला मोठा झटका! उपकर्णधार शुभमन गिल प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर; कोणाला संधी?

Goa Nightclub Fire: हडफडे अग्नितांडव प्रकरणात मोठी अपडेट! लुथरा बंधूंना 5 दिवसांची पोलीस कोठडी

Goa Crime: गोव्यातील 16 वर्षीय शाळकरी मुलीवर अपहरण करुन लैंगिक अत्याचार; महाराष्ट्रातील 39 वर्षीय नराधमाचा कोर्टाने फेटाळला जामीन

Goa News: "गोव्यात 100 हून अधिक बेकायदेशीर क्लब"

SCROLL FOR NEXT