Beed lockdown Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्याच्या lockdown model ची थेट कोलंबियात दखल

कोलंबिया (Colombia) येथील पब्लिक पॉलिसी जर्नलमध्ये (Public Policy Journal) आढावा घेण्यात आला.

दैनिक गोमन्तक

बीडच्या (Beed) 2020 लॉकडाऊन मॉडेलचा (lockdown Model) कोलंबिया (Colombia) येथील पब्लिक पॉलिसी जर्नलमध्ये (Public Policy Journal) आढावा घेण्यात आला; या मॉडेलमधील धोरणात्मक धडे हे आपल्या देशातील राज्यांना तिसऱ्या लाटेविरुद्धच्या लढाईसाठी फायदेशीर ठरतील.

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक हा जीवघेणा होता. करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असतानाच, मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत होता. दुसरीकडे येत्या काही महिन्यात करोनाची तिसरी लाटही येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, यावेळी काहीही चुकिचे होणार नाही याची खबरदारी सरकारने घेतली असली तरी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याने राबवलेले लॉकडाऊनचे मॉडेल हे इतर राज्यांसाठी करोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्याकरिता एक प्रभावी उदाहरण ठरू शकते.

बीड 2020 मॉडेल हे आयव्ही लीगमधील नामांकित महाविद्यालयांपैकी एक असलेल्या कोलंबिया विद्यापीठाच्या पब्लिक पॉलिसी जर्नलमध्ये केस स्टडी म्हणून प्रकाशित केले गेले. बीड जिल्ह्यात करोना विषाणूचे संक्रमण प्रभावीपणे कमी करण्याचे श्रेय हे 2020 मध्ये जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचे प्रभारी पोलीस अधीक्षक असलेले हर्ष पोद्दार आणि त्यांच्या पथकाला दिले जाऊ शकते.

हर्ष पोद्दार आणि त्यांच्या पथकाने पद्धतशीरपणे लॉकडाऊनचे पालन करण्यासाठी ज्या मॉडेलचे अनुसरण केले ते इतके प्रभावी होते की त्यांच्या या मॉडेलमुळेच २०२० मध्ये करोनाच्या पहिल्या लाटेत बीड जिल्ह्याने चांगली कामगिरी केली, पण दुसऱ्या लाटेत त्यांचे हे मॉडेल मात्र सपशेल अपयशी झाले.

“या साथीच्या रोगामुळे महाराष्ट्र पोलिसांच्या इतिहासात एक नवीन अध्याय जोडला गेला, यामुळे पोलीस आणि नागरिक यांच्यात सहानुभूती, विश्वास आणि बांधिलकीचे नवे नाते निर्माण झाले. बीडचे उदाहरण आपल्याला शिकवते की, लॉकडाऊनकडे सरकारने केवळ अंमलबजावणी म्हणून नाही तर सोयीच्या दृष्टीकोनातून पाहणेही फार महत्त्वाचे आहे", असे प्रभारी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार म्हणतात. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात सामाजिक-आर्थिक स्थितीचा वास्तविक अंदाज बांधणेही महत्त्वाचे असल्याचे, पोद्दार म्हणाले.

लोकांच्या हितासाठी तंत्रज्ञानाची जाण

पोलिसांनी त्यांच्या सर्व रणनीती आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी सहानुभूती-अंमलबजावणी-जागरूकता या तीन गोष्टींचा वापर केला. हर्ष पोद्दार यांच्यामार्फत जिल्ह्यातील घरे जिओफेन्सिंग करणे, धार्मिक गुरूंना समाजात जागरूकता वाढविण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि कोविड-१९ शी संबंधित खोट्या बातम्यांचा प्रसार रोखण्यास मदत करणे यासारख्या अनोख्या उपायांची माहिती दिली गेली.

डिजिटल फ्रेंडली होऊन पोलिसांनी लोकांना ऑनलाइन माहिती देऊन मदत करण्यावर भर दिला; जिल्हा पोलिसांच्या सोशल मीडिया युनिटने खोट्या बातम्या, अफवा आणि द्वेषयुक्त माहिती शोधत हॅशटॅग आणि कीवर्ड सर्च केले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आठवड्याचे सातही दिवस 24 तास यांचे परीक्षण सुरू होते. तसेच, हे युनिट अॅक्टिव्ह व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पाठवल्या जाणाऱ्या मेसेजवरही बारकाईने नजर ठेवून होते. लॉकडाऊन संपताच, खोट्या बातम्या आणि द्वेषयुक्त भाषणाविरूद्ध झालेल्या सर्वाधिक कारवाईची नोंद बीड जिल्ह्यात करण्यात आली. यात त्यांनी 60 आरोपींवर 48 गुन्हे दाखल केले होते.

दुसरीकडे, राज्यातील इतर जिल्हे स्थलांतरित मजुर पुन्हा गावी परत असल्यामुळे चिंतेत होते, मात्र बीडने ही परिस्थिती योग्यरित्या हाताळली. पोलीस मुख्यालयात एक समर्पित कंट्रोल रूम तयार करण्यात आला होता. त्याचे काम जिल्ह्यातील १९ निवडक प्रवेशद्वारांच्या माध्यमातून गावी परतलेल्या कामगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे होते. या कालावधीत १.६ लाखांपेक्षा जास्त मजूर स्वगृही आपल्या कुटुंबाजवळ पोहचले. मुख्य म्हणजे यात कोणतीही जीवितहानी किंवा प्राणघातक घटना घडली नाही.

एखाद्या संकटाला आमंत्रण देणे सोपे असते, मात्र ते टाळण्यासाठी मदत करणे कठिण असते. पोलीस अधिकारी मुख्यत: बाहेरच्या वातावरणात जोखमीचे काम करत असतात. त्यामुळे पोलीस या विषाणूपासून सुरक्षित आहेत याची खात्री करण्यासाठी, सर्व पोलीस कर्मचार्‍यांना संरक्षक गीअर देणे ही पहिली पायरी होतीः फेस-शील्ड्स, एन-95 मास्क, ग्लोव्ह्ज, सॅनिटायझर्स आणि अगदी पीपीई किट (कंटेनमेंट झोनमध्ये आणि आयसोलेशन वॉर्डमध्ये तैनात असलेल्यांसाठी). जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस अधिकाऱ्यांना रोगप्रतिबंधक औषधेही पुरविली जात होती.

एकीकडे करोनाव्हायरसच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी वर नमूद केलेली पावले उचलली गेली असतानाच, बीडचे पोलीस कर्मचारी मात्र आपल्या सामाजिक दृष्टिकोनामुळे वेगळे ठरले. राज्यभर या दृष्टीकोनाचा वापर केल्यास लोकांपुढील हे आव्हान आपण पार करू शकतो आणि सर्व जण मिळून सहज व निर्भिडपणे या वादळावर विजय मिळवू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT