अखेर ठरलं! महाराष्ट्रात 1 जूनपर्यंत लॉकडाऊन

Lockdown Extended in Maharashtra.
Lockdown Extended in Maharashtra.
Published on
Updated on

महाराष्ट्रात लॉकडाऊन (Lockdown in maharashtra) लागू करून देखील मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात १५ मे पर्यंत लागू लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. मात्र तरीदेखील या परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण मिळू शकत नसल्याचे दिसते आहे. याच अनुशंगाने राज्यातील लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय अखेर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.  त्यामुळे राज्यात येत्या 1 जून  सकाळी 7 वाजेपर्यंत  लॉकडाऊन वाढविण्याच्या निर्णयावर शिकामोर्तब करण्यात आले आहे.  (Lockdown in Maharashtra till May 31)

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची  संख्या दिवसेंदिवस वाढत असून  रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्राणवायू,  व्हेंटिलेटर, औषधे आणि इतर वैद्यकीय साधन सामग्रीचा तुटवडा आहे.  तर  दुसरीकडे  लसीकरण मोहिमेत देखील मोठ्या अडचणी येताना दिसत आहेत.  या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी  आता पुन्हा राज्यसरकारने 1 जून पर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे.  या काळात अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार आहेत. त्याचबरोबर आता महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांना 48 तासांच्या आतील  RTPCR चाचणी अहवाल  अनिवार्य करण्यात आला आहे.  संवेदनशील भागसह राज्यातील इतर सर्व भागांनाही हा नियम बंधनकारक असेल. त्याचबरोबर दूध उत्पादक,  अत्यावश्यक सेवांची वाहतूक आणि  खाद्यपदार्थाच्या होम डीलीव्हरी ला परवानगी देण्यात आली आहे. तर खासगी वाहनांमध्ये  एकाच वेळी दोन व्यक्तिनाच  प्रवास करता येणार आहे.

दरम्यान, राज्यातील ४५ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांच्या लसीकरणास प्राधान्य दिले जावे असे एकमताने असा सूर मंत्रिमंडळाने आवळला. त्यामुळे राज्यातील 18-44 वयोगटातील लसीकरणाला स्थगिती देण्यात आली असून  लसीचे उर्वरित डोस 45 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांना दिले जाणार आहेत. अशी माहिती  महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.  त्याचबरोबर राज्यातील म्युकरमायक्रोसिस आजाराच्या रुग्णांवर राज्यसरकार विनामूल्य उपचार करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com