ST Corporation Dainik Gomantak
महाराष्ट्र

Covid 19: कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी एसटीचे 'सुरक्षा कवच'

सुरक्षेसाठी लालपरीमध्ये अ‍ॅंटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग (Antimicrobial Chemical Coating) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

राज्यात कोरोनाचं (Covid 19) सावट असताना एसटी महामंडळाने (ST Corporation) गणेशत्सवाच्या पाश्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. कोकणात दरवर्षी गणेशउत्सवानिमित्त कोकणवासी (Konkan) जातात. त्यांच्या सुरक्षेसाठी लालपरीमध्ये अ‍ॅंटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग (Antimicrobial Chemical Coating) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साथीच्या रोगांपासून प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची खबरदारी म्हणून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला गेला आहे. एसटी मंडळाने अशाप्रकारचा पहिल्यांदा प्रयोग केला आहे. प्राथमिक स्तरावर सध्या 826 गाड्यांना अ‍ॅंटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग करण्यात येणार आहे. त्यासाठी रत्नागिरीमध्ये (Ratnagiri) नियुक्त एजन्सीचे कर्मचारी दाखल होणार आहेत.

राज्य परिवहन महामंडळाने काढलेले परिपत्रक एसटी विभागाला प्राप्त झाले आहे. त्या अनुषंगाने आता एसटी विभागाने लालपरीला केमिकल कोटिंग करणार आहे, यासंबंधीची माहिती महामंडळाला देण्यात आली आहे. राज्यातील कोरोना परिस्थीतीमुळे परिवहन मंडळाचे चाक तब्बल दिड वर्ष थांबले होते. आता राज्यातील कोरोना संसर्ग कमी झाल्यामुळे काहीसे निर्बंध शिथील करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु झाल्याने एसटी महामंडळाला एक प्रकारचा दिलासा मिळाला आहे.

दुसरीकडे राज्यात एसटी चाक धावू लागली असली तरी कोरोनामुळे एसटीला तब्बल 16 हजार कोटीचा तोटा सहन करावा लागला आहे. त्यामुळेच आता या कोरोना काळात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी केमिकल कोटिंगचा मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील तब्बल 10 हजार गाड्यांना अॅंटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग करण्यात येणार आहे. यात रत्नागिरी विभागाच्या तब्बल 826 एसटी गाड्यांचा समावेश असणार आहे.

केमिकल कोटिंग वैज्ञानिकरित्या

राज्यातील मैदानी भागापासून ते अतिशय दुर्गम भागामध्ये एसटी पोहोचते. अनेक प्रवाशी एसटीमधून प्रवास करताना स्पर्श करत असतात. ज्यामुळे कोरोनासारखा विषाणूचा प्रसार होण्याचा धोका वाढू शकतो. हाच धोका टाळण्यासाठी राज्य परिवहन मंडळांने अॅंटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग वैज्ञानिकपध्दतीने करण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT