Coronavirus NCP demands GST waiver on oxygen equipment drugs 
महाराष्ट्र

कोरोनाव्हायरस: राष्ट्रवादीने केली 'या' वस्तूवर जीएसटी माफ करण्याची मागणी ...  

दैनिक गोमंतक

कोरोन रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर अत्यावश्यक असलेल्या ऑक्सिजन उपकरणे आणि औषध यावरील वस्तू सेवा कर (GST)  माफ करण्याची मागणी  राष्ट्रवादीने केली असून  आरोग्य सेवा यंत्रणेवर ताण येत असल्याचा दावा  केला आहे. असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने  (ASSOCHAM) 6 मे रोजी वित्त मंत्रालयाला (Finance Minister) लिहिलेल्या पत्राला महाराष्ट्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) जयंत पाटील यांनी ट्विटरवर टॅग करून  ऑक्सिजन उपकरणे (Oxygen equipment) आणि औषध यावरील  वस्तू सेवा कर  (GST), कस्टम (Customs) तसेच इतर  कर 31 मार्च 2022  पर्यंत  माफ करण्याची विनंती  केली आहे . (Coronavirus: NCP demands GST waiver on oxygen equipment drugs)

जिथे भारत वैद्यकीय उपकरणांच्या उपलब्धतेसाठी झगडत आहे तिथे  यावर 12 टक्के वस्तू कर आकारणे निव्वळ हास्यास्पद आहे. @ASSOCHAM4India ने केलेल्या विनंतीचा  मान  ठेऊन @FinMinIndia ने तातडीने ऑक्सिजन उपकरणांवरील कर माफ करावा असे ट्विट राज्याचे जलसंपदा मंत्री पाटील यांनी शनिवारी रात्री केले. जीएसटीसंबंधित निर्णय जीएसटी परिषदेच्या कार्यक्षेत्रात असल्याने या पत्राची प्रत सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांना पाठविली गेली आहे जेणेकरून या प्रकरणाची त्वरेने दखल घेण्यात यावी, असे असोचॅमच्या पत्रात म्हटले आहे.

औषधे आणि औषधी उपकरणांची  वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी रुग्णालये पीएसए प्रकल्प उभारत आहेत तसेच  राज्ये, कॉर्पोरेटसंस्था  आणि देणगीदार ऑक्सिजन केंद्रे, सिलिंडर, क्रायोजेनिक स्टोरेज टॅंक, टँकर इत्यादी खरेदी करीत असल्याचे उद्योग मंडळाने म्हटले आहे. या उपाययोजनांद्वारे देशाला हे सांगणे गरजेचे आहे की या जीवनावश्यक वस्तूंच्या संदर्भात पुरवठा करण्याच्या कोणत्याही अडचणी नाहीत. केवळ सध्याची गरज  पूर्ण करण्याची नाही तर कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचीही  तयारी करावी लागेल, असे या पत्रात सांगितले आहे..

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला घेतले ताब्यात; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

'हा' बॉलिवूड अभिनेता बनणार 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीचा औरंगजेब! 2027 मधील सर्वात मोठ्या चित्रपटाची चर्चा

Goa Crime: भाडेकरुनेच केला मालकाचा आणि मित्राचा खून? दुहेरी हत्याकांडाने हादरले साळीगाव! पोलिसांकडून तपास सुरु

SCROLL FOR NEXT