महाराष्ट्राचे (Maharashtra) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना पुन्हा एकदा कोरोनाची (Covid 19) लक्षणे दिसून आली Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुन्हा कोरोनाची लक्षणे

अजित पवार (Ajit Pawar) यांना कोविड-19 (Covid 19) ची लक्षणे आढळून आली आहेत. ते त्यांच्या अहवालाची वाट पाहत आहेत. अजित पवार यांचे दोन कर्मचारी आणि दोन चालक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

दैनिक गोमन्तक

मुंबई: महाराष्ट्राचे (Maharashtra) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना पुन्हा एकदा कोरोनाची (Covid 19) लक्षणे दिसून आली आहेत. त्यांच्या दोन चालकांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. तपासणीनंतर त्यांच्यामध्ये कोविड-19 ची लक्षणे आढळून आली असल्याचे समोर आले आहे. अशी माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिली आहे. दोन चालकांशिवाय आणखी दोन कर्मचाऱ्यांमध्येही कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी एका दिवाळी कार्यक्रमात ही माहिती दिली.

अजित पवार यांचे कुटुंबीय बारामतीत दिवाळी सोहळ्याला गेले होते. मात्र, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले, अजित पवार यांना कोविड-19 ची लक्षणे आढळून आली आहेत. ते त्यांच्या अहवालाची वाट पाहत आहेत. अजित पवार यांचे दोन कर्मचारी आणि दोन चालक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

कोरोनावरील सरकारच्या कामाचे केले कौतुक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी उचललेल्या पावलांचे कौतुक केले. महाविकास आघाडी सरकारने कोरोनाचे रुग्ण कमी करण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. लवकरच परिस्थिती सुधारेल आणि अर्थव्यवस्था रुळावर असेही पवार यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रात कोरोनाची प्रकरणे

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. जिथे पूर्वी दररोज 10 हजारांहून अधिक केसेस येत होत्या, त्यात मोठी घट झाली आहे. गेल्या 24 तासांत 1,141 नवीन रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत एकूण 6,615,299 प्रकरणे समोर आली आहेत. गेल्या 24 तासांत 32 जणांचा मृत्यू झाला आहे. या विषाणूमुळे राज्यात आतापर्यंत 140,345 जणांनी आपला जीव गमावला आहे. गेल्या 24 तासांत 1,163 लोक बरे झाले आहेत. आतापर्यंत 6,456,263 रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रात आता एकूण 18,691 सक्रिय रुग्ण आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pooja Naik: “संबंधितांची नावे उघड करावी, कोणाचीही गय करणार नाही”, पूजा नाईक प्रकरणी मुख्यमंत्र्यांची कठोर भूमिका

TTP Attacks Pakistani Army: पाकिस्तानला मोठा झटका! खैबर पख्तूनख्वामध्ये 'टीटीपी'चा सैन्याच्या ताफ्यावर भीषण हल्ला, 10 जवान ठार VIDEO

समुद्री मार्ग झाला खुला! 7 वर्षांनंतर मुरगाव पोर्टवर सुरू होणार कंटेनर सेवा, निर्यातदारांना मोठा दिलासा

World Record! 11 चेंडूत 8 षटकार... युवा फलंदाजानं ठोकलं सर्वात जलद अर्धशतक, स्फोटक फलंदाजीचा VIDEO पाहाच

Viral Video: 'ओंकार' हत्तीची शेतात अचानक एन्ट्री... म्हशींनी जीव वाचवण्यासाठी ठोकली धूम, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT