Corona Patients Updates in Maharashtra Dainik Gomantak
महाराष्ट्र

काळजी घ्या! महाराष्ट्रात वाढला कोरोनाचा वेग, 108 दिवसांनंतर मुंबईत केली सर्वाधिक रुग्णांची नोंद

राज्यात सलग चौथ्या दिवशी 500 हून अधिक नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना विषाणू संसर्गाच्या नव्या रुग्णांमध्ये पुन्हा झपाट्याने वाढ होत आहे. राज्यात सलग चौथ्या दिवशी 500 हून अधिक नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. रविवारी महाराष्ट्रात 550 कोरोना प्रकरणे समोर आली आहेत. त्यापैकी 375 प्रकरणे मुंबईत आढळून आली आहेत. या दरम्यान सोलापुरात कोविडमुळे 1 मृत्यू देखील झाला आहे. शनिवारी महाराष्ट्रात 529 आणि मुंबईत 330 कोविड रुग्ण आढळली आहेत. अशाप्रकारे मुंबईत एका दिवसानंतर कोरोनाचे नवीन रुग्णांमध्ये 14 टक्क्यांनी वाढ झाली आहेत. (Corona speed increases in Maharashtra highest number of patients recorded in Mumbai after 108 days)

महाराष्ट्रात गेल्या दोन महिन्यांतील कोरोनाबाधितांची ही सर्वाधिक संख्या असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी 1 मार्च रोजी राज्यात 675 कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. त्याच वेळी, मुंबईत 108 दिवसांनंतर सर्वाधिक प्रकरणे नोंदवण्यात आली. महाराष्ट्रात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 2997 आहे, तर त्यापैकी 2000 सक्रिय रुग्ण एकट्या मुंबई शहरात आठळून आले आहेत. सलग सहाव्या दिवशी मुंबईतील कोरोना रूग्णांच्या रूग्णालयात दाखल होण्याचा आकडा दुहेरी अंकात राहिला आहे. रविवारी शहरातील 17 कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.

मात्र, जानेवारी आणि फेब्रुवारीच्या तुलनेत महाराष्ट्रात आणि विशेषत: मुंबईत कोरोनाचे प्रमाण नगण्य दिसून आले, ही दिलासादायक बाब आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) नुसार, कोरोना रिकव्हरी रेट 98 टक्के एवढा आहे. कोविड प्रकरणांचा दुप्पट होण्याचा दर 2,872 दिवसांचा काळ आहे. त्याच वेळी, 22 ते 28 मे दरम्यान, एकूण वाढीचा दर 0.024 टक्के एवढा आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोना मृत्यूचे प्रमाण 1.87 टक्केवर आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोविड-19 (Covid 19) रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होते आहे. एप्रिलच्या मध्यापर्यंत, राज्याची राजधानी दुहेरी अंकांची नोंद करत होती, तर दररोजच्या प्रकरणांची संख्या वाढत असतानाही, बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, रुग्णालयात दाखल करण्याची गरज कमी असल्याने काळजी करण्याची काहीच गरज नाहीये. मुंबईतील आतापर्यंत 10.64 लाख लोकांना कोरोना संसर्गातून बरे झाल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pooja Naik: '..आमचे पैसे परत मिळवून द्या'! Cash For Job प्रकरणी फसवणूक झालेल्यांचे CM सावंतांसमोर गाऱ्हाणे; Watch Video

Pooja Naik: 'देसाई, पार्सेकरांना पैसे दिल्‍याचे पुरावे माझ्‍या मोबाईलमध्‍ये'! पूजा नाईकचा दावा; Special Interview

IND vs PAK: पाकडे नाही सुधारणार! LIVE सामन्यात शिवीगाळ करत 'लज्जास्पद' कृत्य Watch Video

Morjim Beach: गोव्याच्या 'मोरजी बीच'वर बैलांची झुंज, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल Watch Video

Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरण, 'आय 20' कारचा मालक आमिर अटकेत; दहशतवादी डॉ. उमरसोबत आखली होती स्फोटाची योजना

SCROLL FOR NEXT