Ashok Shankarrao Chavan Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्रात काँग्रेसला बसू शकतो मोठा झटका, ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण BJP च्या वाटेवर?

Maharashtra Politics: महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसू शकतो.

दैनिक गोमन्तक

Maharashtra Politics: महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसू शकतो. ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण गुरुवारी गणेश दर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी आशिष कुलकर्णी यांच्या वरळीतील घरी पोहोचले होते. इथे त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली. ते कधीही भारतीय जनता पक्षात जावू शकतात. भाजपमधील नेत्यांबरोबरची त्यांची जवळीकता अलीकडच्या काळात अधिकच वाढली आहे. याशिवाय, ते काँग्रेसच्या G-23 या बंडखोर गटाचे सदस्य आहेत. नुकताच काँग्रेसचा राजीनामा दिलेल्या गुलाम नबी आझाद यांचीही त्यांनी भेट घेतली होती.

दरम्यान, महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन होण्यापूर्वी झालेल्या राज्यसभा आणि एमएलसी निवडणुकीत आशिष कुलकर्णी यांनी रणनीतीकार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती. कुलकर्णी यांनी शिवसेना सुप्रीमो बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी या दोघांसोबत काही काळ काम केले आहे. महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष होण्यापूर्वी त्यांनी शिवसेना आणि काँग्रेससोबतही काम केले होते.

अशोक चव्हाण यांनी अटकळ खोडून काढली

मात्र, लवकरच दिल्लीतील 'भारत जोडो' या काँग्रेसच्या मेळाव्यात सहभागी होणार असल्याचे अशोक चव्हाण सांगितले. त्यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश करण्याच्या सर्व अटकळांना पूर्ण विराम दिला. माध्यमाशी बोलताना चव्हाण म्हणाले, "देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आले तेव्हा मी आशिष कुलकर्णी यांच्या घरी गणेश दर्शनासाठी पोहोचलो. अनेक पाहुण्यांच्या उपस्थितीत आमची सौहार्दपूर्ण बैठक झाली. असे निष्कर्ष काढणे चुकीचे आहे."

कोण आहेत अशोक चव्हाण?

अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे नांदेड जिल्ह्यातील सर्वात शक्तिशाली कुटुंबांपैकी एक आहे. माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे ते पुत्र आहेत. अशोक चव्हाण यांनी 2008 ते 2010 या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनही काम पाहिले. आदर्श हाऊसिंग सोसायटी घोटाळ्यात त्यांचे नाव समोर आल्यानंतर पक्षाच्या हायकमांडने त्यांना राजीनामा देण्यास सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT