Nana ptole Dainik Gomantak
महाराष्ट्र

सीएनजीचे भाव केंद्र सरकारनेच वाढवले - नाना पटोले

महाविकास आघाडी सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील मतभेद संपेनात

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रात सक्रिय असणारी महाविकास आघाडी सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील वितूष्ट संपलेले नाही. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपुर्वी पंतप्रधान मोदी यांनी घेतलेल्या बैठकीत महाराष्ट्राची थकबाकी किती आहे. याचा पाढा वाचत केंद्र सरकारवरची नाराजी स्पष्ट केली. तर महाविकास आघाडीवर म्हणजेच महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर कमी करण्यावरुन ताश्चर्य ओढले आहेत. या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी सीएनजीवरुन केंद्रावर पुन्हा आरोप केला आहे. (CNG prices hiked by central government )

पटोले याबाबत बोलताना म्हणाले कि, केंद्र सरकारने नैसर्गिक वायूच्या किमतीत वाढ केल्याने सीएनजीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. “महाराष्ट्र सरकारने सीएनजीवरील वॅट १३.५ टक्क्यांवरुन घटवून ३ टक्क्यांवर आणला. पण केंद्रातील भाजपा सरकारने याच काळात सीएनजीच्या दरात ३० रुपयांनी वाढ करुन जनतेला मिळणाऱ्या दिलाशाच्या मार्गात अडथळा आणला.” अशा शब्दांमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे

तसेच, “महागड्या पेट्रोलियम उत्पादनांवरुन राज्य सरकारांवर खापर फोडण्याऐवजी केंद्र सरकारने आत्मचिंतन करावे.” असा सल्ला देखील नाना पटोलेंनी दिला आहे.1 एप्रिल रोजी महाराष्ट्र सरकारने सीएनजीवरील व्हॅटमध्ये मोठी कपात केली होती. हे दर 13 टक्क्यांवरून 3 टक्क्यांवर आणले. यामुळे किंमतींमध्येही मोठी घसरण झाली.

मात्र, त्याच दिवशी केंद्र सरकारने नैसर्गिक वायूच्या किमती 100 टक्क्यांहून अधिक वाढवल्या होत्या, त्यानंतर सीएनजी आणि पीएनजीची इनपुट कॉस्टही वाढली होती आणि कंपन्यांनी त्यांच्या किरकोळ किमतीही वाढवल्या. भारत सरकारने 1 एप्रिलपासून 110 टक्के वाढ केलेली आहे. त्यामुळे एमजीएलकडून खरेदी केल्या जाणाऱ्या गॅसच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे सीएनजीच्या किमतीत वाढ झाली असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

SCROLL FOR NEXT