Health Minister Rajesh Tope

 

Dainik Gomantak 

महाराष्ट्र

लॉकडाऊन टाळायचा असल्यास...: राजेश टोपे

महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमाशी बोलताना राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

देशात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने धूमाकूळ घालत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. या पाश्वभूमीवर अनेक राज्यांनी पुन्हा एकदा निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात मागील काही दिवसांपूर्वीच नाईट कर्फ्यू लावण्याची घोषणा करण्यात आली होती. यातच आता महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमाशी बोलताना राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

यावेळी आरोग्य मंत्री म्हणाले, ''राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुन्हा एकदा आम्ही निर्बंध लावण्याची वेळ आमच्यावर आली आहे. लॉकडाऊन टाळायचा असल्यास नागरिकांनी कोरोना प्रोटोकॉलचे पालन करावे. लोकांनी शिस्त पाळली तर कोरोना निर्बंध लावण्याची गरजच भासणार नाही. यातच आता लग्न, धार्मिक कार्यक्रम, त्याचबरोबर राजकीय कार्यक्रमास रोख लावण्यात येत आहे.''

ते पुढे म्हणाले, 'दिवसभरात कोरोनामुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटचा प्रसार वाढू लागल्यामुळे नागरिकांनी सतर्क, सावध राहिले पाहिजे. दोन दिवसांत मुख्यमंत्री आढावा बैठक घेणार आहेत. नागरिकांनी कोरोना नियमाचं पालन केल्यास लॉकडाऊन लावण्याची गरज भासणार नाही. मुंबईचा या आठवड्यात पॉझिटीव्हीटी रेट 10 टक्क्याच्या आसपास आहे. कोरोनाबाधितांचे जिनोम सिक्वेसिंग आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक भागामध्ये जिनोम सिक्वेसिंग लॅब उघडण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT