CM Uddhav Thackeray will decide about Lockdown 

 

Dainik Gomantak 

महाराष्ट्र

'...यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील'

राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी लॉकडाऊन बद्दल भाष्य केले.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसच्या रुग्णांमद्धे मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सरकार लॉकडाऊन करणार का?, हा सध्या लोकांमधील चर्चेचा विषय आहे. यातच राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी लॉकडाऊन बद्दल भाष्य केले.

वडेट्टीवार म्हणाले, "राज्यात नवीन लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्याची वेळ जवळ येत आहे. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर अंतिम निर्णय घेतील. प्रवास आणि महाविद्यालयांवरील निर्बंधांचा निर्णय एकत्रितपणे घेतला जाईल." 2021 च्या शेवटच्या 11 दिवसांमध्ये महाराष्ट्रात कोविड-19 (COVID-19) संसर्गामध्ये झपाट्याने वाढ झाली. यामुळे राज्य सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली.

"विवाह किंवा इतर कोणत्याही सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रमाच्या बाबतीत, उपस्थितांची जास्तीत जास्त संख्या 50 व्यक्तींपर्यंत मर्यादित असेल. अंत्यसंस्कारात जास्तीत जास्त उपस्थितांची संख्या 20 पर्यंत मर्यादित असेल," असे महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे.

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) शुक्रवारी (नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला) लोकांना संध्याकाळी 5 ते पहाटे 5 या वेळेत समुद्रकिनारे, मोकळी मैदाने, समुद्राचे दर्शनी भाग, विहार, उद्याने, व उर्वरीत सार्वजनिक ठिकाणी जाण्यास मनाई केली. कोविड-19 ची वाढती प्रकरणे आणि त्याचे ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेता, हे निर्बंध 15 जानेवारीपर्यंत कायम राहतील, असे पोलिसांनी सांगितले.

महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य), डॉ प्रदीप व्यास यांनी शुक्रवारी दावा केला की जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यात दोन लाख सक्रिय कोविड -19 प्रकरणे दिसू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT