Maharashtra School Reopen: महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे (Covid 19) लावण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि अन्य निर्बंधामुळे मागील जवळपास दीड वर्षाहून अधिक काळ बंद असलेल्या राज्यभरातील सर्व शाळा आजपासून पुन्हा एकदा सुरु करण्यात आल्या आहेत. मुंबई (Mumbai), पुणे, ठाण्यासह राज्यभरातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये आज चिमुकल्या विद्यार्थ्यापासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने गजबजून गेले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधला आहे. माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी या कार्यक्रमातर्गंत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संवाद साधला.
दरम्यान, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपल्या लहानपणीच्या काही आठवणी सांगितल्या. बऱ्याच महिन्यानंतर शाळेची घंटा ऐकायला मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील कोरोनाचा काळ कठीण आहे. शाळा सुरु करण्याचा निर्णय घेणे हे आमच्या पुढील खूप अवघड असा निर्णय होता. शाळेचे नाही तर आपल्या भविष्याचं दार उघडलं असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिक्षकांना आणि वडिलांना आपल्या मुलांची काळजी घेण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे.
याशिवाय, ''मुख्यमंत्री म्हणाले, शिक्षकांना आरोग्याबाबत शंका आल्यास त्यांनी त्वरीत कोरोनाची चाचणी करुन घेणे गरजेचे आहे. त्यासह विद्यार्थ्यांकडे देखील लक्ष गरजेचे आहे. ऋतुमध्ये होत असलेल्या बदलांमुळे साथीचे रोगही उध्भवत आहेत. त्यामुळे या दरम्यान कोरोनाची दुसरी लाट आली नाही तर, याची खात्री करुन घेणे महत्त्वाचे आहे. तसेच सर्वच शिक्षकांनी काळजी घ्यावी की शिक्षणाची जागा, वर्ग बंदीस्त नसायला हवे, ते खुले असयला हवे.''
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.