Osho Aashram Dainik Gomantak
महाराष्ट्र

Pune: ओशो आश्रमात गोंधळ; पोलिसांनी केला लाठीचार्ज

Pune: पोलिसांनी अनेक अनुयायांना ताब्यातही घेतले आहे.

दैनिक गोमन्तक

Pune: पुण्यातील ओशो आश्रमात मोठा गोंधळ निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस आणि अनुयायी यांच्यात संघर्ष झालेला दिसून आला आहे. या संघर्षात पोलिसांनी ओशो अनुयायांवर लाठीचार्ज केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओशो आश्रम प्रशासन आणि ओशो अनुयायामध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. आता अनुयायांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आश्रमाच्याबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.

अनुयायी आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्जचा अवलंब केला. अनुयायांनी जबरदस्तीने आश्रमात प्रवेश केल्यानंतर परिस्थिती बिघडली त्यानंतर या संघर्ष वाढल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी अनेक अनुयायांना ताब्यातही घेतले आहे.

दरम्यान, आचार्य रजनीश ओशो यांचा काल 70वा संबोधी दिवस साजरा झाला. या निमित्तानं जगभरातून अडीच ते तीन हजार ओशोंचे अनुयायी कोरेगाव पार्क येथील आश्रम परिसरात दाखल झाले.

मोठ्या प्रमाणावर अनुयायी एकत्रित आल्याने त्यांनी ओशो आश्रमात सुरक्षारकांना डावलून प्रवेश मिळवला, त्यामुळं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karapur Sarvan Sarpanch: कारापूर-सर्वण सरपंच निवडीसाठी मंगळवारी बैठक, बिंदिया सावंत यांचे नाव निश्‍चित तरी उत्सुकता

Goa Monsoon: पावसाचा 20 इंचांचा टप्पा पार, मध्यम स्वरूपाचा पाऊस कायम; रविवारी 1 इंच पावसाची नोंद

खरी कुजबुज: काँग्रेस व भाजप अंतर्गत वादाच्या भोवऱ्यात!

Goa Congress: फसवणूक करणाऱ्यांना पाठीशी घालू नये, चिट्टी बाबू घंटावर कारवाई कधी? काँग्रेसचा सरकारला सवाल

Banyan Plantation: राज्‍यभरात लावणार वडाची 10 लाख रोपटी, जैवविविधता मंडळामार्फत महिनाभर करणार मोफत वितरण- मुख्‍यमंत्री सावंत

SCROLL FOR NEXT