Chandrakant Patil and Devendra Fadnavis Dainik Gomantak
महाराष्ट्र

चंद्रकांतदादांचे भाकित, म्हणाले फडणवीस वर्षभरातच मुख्यमंत्री होणार

पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस हे येत्या वर्षभरात मुख्यमंत्री होतील असे भाकित केले.

दैनिक गोमन्तक

महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi) कोसळणार असल्याचे भाकीत भाजप नेत्यांकडून अनेकवेळा करण्यात आल आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप नेत्यांनी अनेक तारखा देखील दिल्या आहेत. मात्र, त्यांची ही भाकिते साफ फेल ठरली आहेत. यानंतर, पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस हे येत्या वर्षभरात मुख्यमंत्री होतील असे भाकित केले. कोल्हापूर जिल्ह्रयातील आजरा तालुक्यात एका कार्यक्रमात त्यांनी पुन्हा एकदा हा दावा केला. (Chandrakant Patil prediction that Devendra Fadnavis will be the Chief Minister in year)

येत्या वर्षभरात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री (Devendra Fadnavis) होतील व त्यांच्याच हस्ते स्वामी विवेकानंद पतसंस्थेचा सुवर्ण महोत्सवी समारंभ व अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांचा 61 वा कार्यक्रम होईल असेही चंद्रकांतदादा (Chandrakant Patil) म्हणाले आहेत. सुवर्ण महोत्सव साजरा करीत असलेल्या स्वामी विवेकानंद पत संस्थेच्या वतीने उभारलेल्या श्री लक्ष्मी देवी उद्यान लोकार्पण सोहळ्यात बोलताना त्यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेश हाळवणकर तर प्रमुख उपस्थिती भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके देखील होते.

पतसंस्थेचे अध्यक्ष जनार्दन टोपले यांनी स्वागत व प्रास्ताविकात त्यावेळी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला गेला. यावेळी श्री लक्ष्मी देवी उद्यान संकल्पक पत्रकार समीर देशपांडे, उद्यान विकासक सुधीर कुंभार, मयूर कुंभार व श्री लक्ष्मी देवी यात्रा समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला आहे. शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांचे वीर पिता व वीर माता यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला आहे.

कार्यक्रमास महादेव उर्फ बापू टोपले, विलास नाईक, मलिक बुरुड, नाथाजी पाटील, अल्केश कांदळकर, सुधीर मुंज डॉ.अनिल देशपांडे, रमेश कारेकर, सरव्यवस्थापक आनंदा कुंभार यासह पतसंस्थेचे संचालक, सभासद व आजरेकर नागरिक उपस्थित होते, सूत्रसंचालन समीर देशपांडे तर उपाध्यक्ष दयानंद भुसारी यांनी यावेळी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Under 23 Cricket: कर्नल नायडू करंडकात गोव्याचा पराभव; बडोद्याची 4 विकेट्सनी बाजी

National Shilp Guru Award: गोव्याच्या मातीकलेचा राष्ट्रीय गौरव! अमर शेट यांना 'राष्ट्रीय शिल्पगुरू पुरस्कार'

Yuzvendra Chahal: वर्ल्ड कप 2023 मधून पत्ता का कट झाला? युजवेंद्र चहलचा मोठा खुलासा; म्हणाला, 'रोहित शर्माने मला आधीच सांगितले होते...'

Unnatural Death Case: नागव्यात 17 वर्षीय मुलाची आत्महत्या; हणजूण पोलिसांकडून तपास सुरू

Tesla Roadster Flying Car: रस्त्यावर धावणारी कार आता हवेतही उडणार! हेलिकॉप्टरसारखी लँडिंग, थ्रस्टरच्या मदतीने भन्नाट स्टंट Watch Video

SCROLL FOR NEXT