Sangli Dainik Gomantak
महाराष्ट्र

Sangli News : महाराष्ट्रात पाणथळ रक्षणाचे आव्हान : राजेंद्र केरकर

Sangli News : राज्य पक्षीमित्र संमेलनाचे उद्‍घाटन

गोमन्तक डिजिटल टीम

Sangli News : सांगली, महाराष्ट्रात नैसर्गिक वृक्ष आच्छादन घटत आहे. त्यामुळे पक्षांचा अधिवास संकटात आहे.

हे रोखण्यासाठी पाणथळ स्थळांचे रक्षण करण्याबरोबर ग्रामीण शहरी भागात जैवविविधता मंडळे सक्रिय करणे गरजेचे आहे, असे मत गोव्यातील नदी आणि जंगल संवर्धन क्षेत्रातील तज्ज्ञ राजेंद्र केरकर यांनी मांडले.

शांतीनिकेतन मध्ये ३६ वे पक्षीमित्र संमेलनाचे उद्‍घाटन शनिवारी (ता. २३) सकाळी त्यांच्याहस्ते झाले. यावेळी भारती विद्यापीठ पर्यावरण विज्ञान विभाग प्रमुख आणि पक्षिमित्र डॉ. एरिच भरूचा, फेदर लायब्ररीच्या ईशा मुन्शी,

स्वागताध्यक्ष डॉ. रविंद्र व्होरा, महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर, डॉ. अजित उर्फ पापा पाटील, बर्डसाँगचे संस्थापक अध्यक्ष शरद आपटे, डॉ. गजानन वाघ, डॉ. तुळजापुरकर, सुनिल करकरे आदींची उपस्थिती होती.

केरकर म्हणाले, ‘सर्वाधिक धरणाची संख्या असणाऱ्या महाराष्ट्र पाण्याच्या दुर्भिक्ष्याला सामोरे जात आहे. गोव्यात जैवविविधता समित्या मार्फत लोक जैवविविधता नोंदीचे जे काम चालू आहे, त्यातून महाराष्ट्राने प्रेरणा घेण्याची गरज आहे.’

संमेलनात सकाळी दहा वाजता ग्रंथदिंडी काढण्यात आली. अजित पाटील यांच्यावर माहितीपट दाखवण्यात आला. संमेलनात फेदर लायब्ररीच्या ईशा मुन्शी यांनी पक्षांची पिसे याविषयी सादरीकरण केले. जयसिंगपुर येथील श्रेयस मानगावे यांनी पक्ष्यांच्या पिसांवरुन केलेले संशोधन सादर केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT