मुंबई : महाराष्ट्रवासीयांचा लाडका उत्सव म्हणजे गणेशोत्सव (Ganesh Festival). आणि गणपती उत्सव म्हटल की खास आठवण येते ती कोकणाची (Koukan). म्हणून गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी सेंट्रल रेल्वेने स्पेशल ट्रेन्सची (Special train) सोय केली आहे. या विशेष ट्रेन 5 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर दरम्यान चालवल्या जाणार आहेत. (Central Railway has arranged special trains for the citizens going to Konkan for Ganpati Utsav)
जसजसा गणोशोत्सव जवळ येतोय तसतशी चाकरमान्यांना आपल्या जाण्याची ओढ लागते. मागच्या वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊनचे नियम कडक असल्याने अनेकांना गावी जाता आले नाही. मात्र यंदा नागरिकांना कोकणात आपल्या गावी जाता यावं यासाठी सेंट्रल रेल्वेने खास सोय केली आहे. येत्या 5 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर दरम्यान विशेष ट्रेन चालवल्या जाणार आहेत.
कोणत्या आहेत त्या विशेष रेल्वे ?
1. मुंबई सीएसएमटी-सावंतवाडी-मुंबई सीएसएमटी (आरक्षित)
ही गाडी मुंबई सीएसएमटी ते सावंतवाडी पूर्ण आरक्षित स्पेशल ट्रेन असून ती 5 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर दरम्यान दररोज चालवली जाणार आहे. ही गाडी रात्री 12.20 मिनिटांनी मुंबई सीएसएमटी येथून रवाना होईल आणि 2 वाजता सावंतवाडीला पोहचेल. त्यानंतर हीच ट्रेन सावंतवाडी स्टेशनमधून 2.20 वाजता निघून दुसऱ्या दिवशी पहाटे 4.35 वाजता मुंबईला पोहचेल.
त्याचबरोबर ही ट्रेन दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्दा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडावली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबणार आहे.
2. मुंबई सीएसएमटी-रत्नागिरी-मुंबई सीएसएमटी (पूर्ण आरक्षित)
मुंबई सीएसएमटी- रत्नागिरी ही स्पेशल ट्रेन 6 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर दरम्यान मुंबईहून दर सोमवारी आणि शुक्रवार चालवली जाणार आहे. मुंबई सीएसएमटी स्थानकातून दुपारी 1 वाजून 10 मिनिटांनी ही ट्रेन सुटणार आसून त्याचदिवशी रात्री 10.35 वाजता रत्नागिरीला पोहोचणार आहे. त्यानंतर रत्नागिरीहून पुन्हा हीच गाडी 11.30 वाजता मुंबई सीएसएमटीसाठी रवाना होणार आहे. रत्नागिरीहून दर रविवारी आणि गुरुवार 9 ते 23 सप्टेंबर दरम्यान ही ट्रेन चालवली जाणार आहे.
ही गाडी संगमेश्वर रोड, अरावली रोड, सावर्दा, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा, पनवेल आणि दादर स्थानकांवर थांबणार आहे. मुंबईहून सुटणारी गाडी मागील सर्व स्थानकांवर थांबेल आणि ठाणे स्थानकात तीचा अतिरिक्त थांबा असणार आहे.
3. पनवेल - सावंतवाडी रोड - पनवेल (पूर्ण आरक्षित)
7 ते 22 सप्टेंबर दरम्यान पनवेल येथून सकाळी 8 वाजता सुटणारी ही ट्रेन त्याच दिवशी सावंतवाडीला रात्री 8 वाजता पोहोचणार आहे. तसेच सावंतवाडी-पनवेल स्पेशल ट्रेन सावंतवाडी येथून दर मंगळवार, बुधवार आणि शनिवारी रात्री 8.45 वाजता सुटणार असून दुसर्या दिवशी सकाळी 7.10 वाजता ही ट्रेन पनवेलला पोहोचेल. मात्र हि ट्रेन दर मंगळवार, बुधवार आणि शनिवारीच चालवली जाणार आहे.
या ट्रेनचा मार्ग पनवेल-सावंतवाडी रोड-पनवेल ट्रेन रोहा, माणगांव, वीर, खेड, चिपळूण, सावर्दा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडावली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ असा असणार आहे.
4. पनवेल-रत्नागिरी-पनवेल (पूर्ण आरक्षित)
पनवेल - रत्नागिरी ही स्पेशल ट्रेन पनवेल येथून 9 ते 23 सप्टेंबर दरम्यान दर गुरुवार आणि रविवारी सकाळी 8 वाजता सुटणार असून, त्याच दिवशी ही ट्रेन 3.40 वाजता रत्नागिरीला पोहोचणार आहे. ही विशेष ट्रेन पनवेल-रत्नागिरी-पनवेल रोहा, माणगांव, वीर, खेड, चिपळूण, सावर्दा, अरावली रोड आणि संगमेश्वर रोड या स्थानकांवर थांबा घेणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.