NEET exam 2021 Dainik Gomantak
महाराष्ट्र

NEET Exam: विद्यार्थ्यांच्या गोवा वारी ला ब्रेक; कोकणात दोन केंद्रे

जिल्यातील विद्यार्थ्यांना आधार मिळाला आहे. NEET परीक्षेसाठी आता गोवावारी (Goa) थांबणार आहे.

दैनिक गोमन्तक

रत्नागिरी (ratnagiri) आणि सिंधुदुर्ग (sindhudurg) जिल्ह्यात खासदार विनायक राऊत (viinayak raut) आणि पालकमंत्री उदय सामंत (uday samant) या दोघांच्या प्रयत्नांतून दोन नीटची परीक्षा (NEET exam) केंद्रे मंजूर करण्यात आले आहे.जिल्यातील विद्यार्थ्यांना आधार मिळाला आहे. परीक्षेसाठी आता गोवावारी थांबणार आहे. सरकाच्या या परीक्षेच्या निर्णयामुळे पालकांत कौतुक होत आहे. (Center at Sindhudurg for NEET examination)

विद्यार्थ्यांना वैद्यकीय आणि औषध निर्माण शास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नीटची परीक्षा द्यावी लागते. मात्र विद्यार्थ्यांना नीटच्या परीक्षेचे केंद्र सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नसल्याने गोवा येथे ही परीक्षा देण्यासाठी जावे लागत होते. यामुळे नीट परीक्षेचे केंद्र सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी मध्ये होयला हवे, अशी मागणी होत होती.

आमदार वैभव नाईक आणि बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था कुडाळचे चेअरमन उमेश गाळवणकर या दोघांनी खासदार राऊत आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांच्याकडे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये नीट परीक्षा केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. खासदार राऊत व श्री. सामंत व उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने नॅशनल टेस्टिंग एजन्जीचे चेअरमन एम. एस. अनर्थ यांच्याकडे 18 मार्च 2021 व ऑगस्टच्या पत्रान्वये व केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांच्याकडे दिनांक 20 ऑगस्ट 2020 च्या पत्रान्वये सातत्याने पाठपुरावा केला होता.

केंद्र सरकारची नॅशनल टेस्टिंग आवश्यक असलेली प्रक्रिया, वैद्यकीय शिक्षण संशोधन संचालनालय मुंबई व जिल्हाधिकारी सिंधुदुर्गच्या माध्यमातून होते. वेळोवेळी पाठपुरावा करून पूर्ण करून घेतली आणि संपूर्ण देशामध्ये नीट परीक्षेची नवीन 55 केंद्रे मंजूर करण्यात आली. यामध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यामध्ये नीट परीक्षा केंद्रे मंजूर झाली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोवा सरकार गाढ झोपेत, तर गृहमंत्री त्यांच्या राजकीय अजेंड्यात

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

Julus in Goa: मडगावात ईद ए मिलाद उत्साहात साजरा

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT