Mumbai Goa Accident Dainik Gomantak
महाराष्ट्र

Video: मुंबई गोवा हायवेवर मोठा अपघात; पंक्चर शिवशाहीला धडकली कार, प्रसिद्ध निवेदकाचा जागीच मृत्यू

पंक्चर झाल्याने रस्त्याकडेला थांबलेल्या शिवशाही बसला कार जोरात धडकल्याने हा अपघात झाला.

Pramod Yadav

मुंबई - गोवा महामार्गाचे काम मागील बारा वर्षांपासून रखडले असून, हायवेवर अपघाताचे सत्र थांबता थांबेना. दरम्यान, या मार्गावर पनवेल जवळ झालेल्या अपघातात प्रसिद्ध निवेदकाचा जागीच मृत्यू झाला आहे. पंक्चर झाल्याने रस्त्याकडेला थांबलेल्या शिवशाही बसला कार जोरात धडकल्याने हा अपघात झाला.

ठाणे येथील इव्हेंट मॅनॅजमेण्ट करणारे सुप्रसिद्ध निवेदक दीपेश मोरे यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपेश मोरे महाड येथील कार्यक्रम आटपून आपल्या सहकाऱ्यांसह मुंबईच्या दिशेने निघाले होते. पनवेल येथील चिंचवण गावाजवळ उभ्या असलेल्या शिवशाही बसला भरधाव येणाऱ्या कारने जोराची धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की यात गाडीतील दीपेश मोरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर तीनजण जखमी झाले आहेत. चिंचवण गावाच्या हद्दीत शिवशाही बसचा टायर पंक्चर झाल्याने ती रस्त्यावर उभी होती.

अपघात झाल्यानंतरचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात कारने थांबलेल्या शिवशाहीला पाठीमागून धडक दिल्याचे दिसत आहे. यात कारच्या समोरील भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसत आहे.

मोरे अर्टिगा गाडी क्र एमएच 04 जीएम 2495 ही घेऊन चालले होते. गाडीचा अंदाज न आल्याने अर्टिगा गाडी चालकाने शिवशाही बसला पाठीमागून धडक दिली. मोरे यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेले त्यांच्या सहकारी रश्मी खावणेकर आणि श्रद्धा जाधव व कोमल माने या किरकोळ जखमी झाल्या आहेत. जखमी झाल्याने त्यांना लाईफलाईन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Haircut in Shravan: श्रावण पाळणार आहात? केस-दाढी कापायची नाही; मग केसांची काळजी कशी घ्याल?

Goa Opinion: सभापतींनी पक्षीय बैठकीत सहभागी व्हावे का?

Jay Gupta: जय गुप्तासाठी FC Goa ला मिळाली 'विक्रमी' रक्कम! बदल करारांतर्गत खेळणार ईस्ट बंगालकडून

Goa Accidents: पूर्वी गोव्यात 31 डिसेंबर साजरा झाल्यावर बेहोष, मदमस्त पर्यटकांचे अपघात व्हायचे; आता ते रोजच होताहेत

Bear Attacks Farmer: अस्वलाचा जीवघेणा हल्ला, तरीही जखमी शेतकऱ्याने 4 किमी चालत गाठलं घर; वाचा नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT