Heat Wave In Goa: शालेय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी; सरकारने घेतला मोठा निर्णय

राज्यात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा
Heat Wave In Goa
Heat Wave In Goadainik gomantak
Published on
Updated on

Heat Wave In Goa: हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेने आज (गुरूवारी, दि.09) उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर गोवा सरकाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिल्याने राज्यातील शाळा दुपारी बारा वाजेपर्यंत बंद करण्याचा सूचना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शिक्षण संचालकांना दिला आहे.

त्यामुळे आज (गुरूवारी) आणि शुक्रवारी दुपारी बारा वाजता शाळा बंद केल्या जातील. विद्यार्थी आणि पालकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

गोवा वेधशाळेने राज्यात आज, 9 मार्च रोजी उष्णतेच्या लाटेची घोषणा केली असून लोकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे. खासकरून ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी स्वत:ची काळजी घ्यावी. राज्यात अशा प्रकारे कमाल तापमानात वाढ होण्याची घटना दुसऱ्यांदा घडत आहे.

Heat Wave In Goa
Heat Wave In Goa: काळजी घ्या! राज्यात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा

दरम्यान, बुधवारी राज्यात मार्चमधील सर्वाधिक 38.4 अंश तापमानाची नोंद करण्यात आली, जी सामान्य कमाल तापमानाच्या तुलनेत 6 अंशांनी अधिक आहे. मार्च 1979 मध्ये तापमानाचा पारा 39 अंशांवर गेला होता. यापूर्वी 3 मार्च 2013 मध्ये 38.7 अंश सेल्सियस तापमान होते.

 गोवा हे राज्य समुद्र किनाऱ्याकाठी वसलेले आहे. अशा ठिकाणी ज्यावेळी कमाल तापमान दोन दिवस 37 अंशांवर जाते, तसेच ज्यावेळी तापमान सर्वसामान्य तापमानाच्या तुलनेत 4.5अंशांनी अधिक असते, अशावेळी उष्णतेची लाट जाहीर करण्यात येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Weather Update
Rahul's mother makes emotional appeal to Deepvihar school principal
Sattari waterfall drowning case
Goa Schools Religious Activities Ban
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com