Devendra Fadnavis & Eknath Shinde Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra Cabinet: शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार याच आठवड्यात! गृह खातं फडणवीसांकडे?

गोमन्तक डिजिटल टीम

महाराष्ट्रात सत्तांतर होऊन एक महिना उलटला आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (CM Eknath Shinde And DCM Devendra Fadanvis) यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. मात्र, नवीन सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अद्याप रखडला आहे. यावरून अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत, तसेच विरोधकांकडून टिका केली जात आहे. अशात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) देखील कालपासून दिल्लीत आहेत. यामुळे रखडलेलल्या मंत्रिमंडळ विस्तारावर यावेळी निश्चित तोडगा निघेल असे मानले जात आहे.

अशात मुख्यमंत्री एकनाथ यांनी शनिवारी महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्तार याच आठवड्यात होईल असे वक्तव्य केले. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचा तिडा मार्गी लागणार असल्याची चिन्हे असून, गृहमंत्रीपद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार असल्याची राजकिय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना देखील मंत्रिमंडळात संधी दिली जाणार आहे. पण, त्यांना कोणतं खातं दिलं जाईल याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

पहिल्या टप्प्यात भाजप आणि शिंदे गटातील काही नेत्यांना शपथ दिली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, दोन्ही बाजूला इच्छुकांची मांदियाळी असल्याने कोणाला संधी मिळते हे पाहणं औत्युक्याचे ठरणार आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून त्यांची तिसऱ्यांदा दिल्ली वारी होत आहे. या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह शिंदे-फडणवीस अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळाची यादी भाजपश्रेष्ठीच निश्चित करणार असल्याचे बोलले जात आहे.

शिंदे गटातून गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, शंभूराज देसाई, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, संदीपान भुमरे, संजय शिरसाट यांची नावे मंत्रिपदासाठी समोर येत आहेत. तसेच, भाजपमधून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, बबनराव लोणीकर, प्रवीण दरेकर, रविंद्र चव्हाण, नितेश राणे यांची नावे मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fraud Case: बनावट 'आयपीओ'चे आमिष; ज्येष्ठाची 4 कोटींची फसवणूक, कोल्हापूर येथून संशयिताला अटक

पैसे परत न केल्यास FIR! वादग्रस्त 'कामसूत्र अँड ख्रिसमस' कार्यक्रमावर क्राईम ब्रँचची मोठी कारवाई

Goa Politics: काँग्रेस युतीस तयार; जागांबाबत विजय, मनोजशी लवकरच चर्चा; गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांची माहिती

T20 World Cup 2026 मध्ये भारत-पाकिस्तान भिडणार, कधी आणि कुठे होणार हाय-व्होल्टेज सामना? मोठी अपडेट आली समोर

Goa Live News:चावडी-काणकोणमध्ये ज्वेलरी दुकानात चोरीचा प्रयत्न; पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांवर दगडफेक!

SCROLL FOR NEXT