Bus services from Belgaum to Maharashtra Dainik Gomantak
महाराष्ट्र

परिवहन महामंडळाच्या बेळगाव आगाराला अजब आदेशांचा आर्थिक फटका

संसर्गामुळे कर्नाटकने (Karnataka) बेळगावातून (Belgaum) कोल्हापूर (Kolhapur) आणि सातारा (Satara) जिल्ह्याकडे जाणारी बससेवा (Bus services) सोमवारपासून बंद करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

बेळगाव : कोरोनामुळे आधीच तोट्यात चालणाऱ्या परिवहन महामंडळाच्या बेळगाव (Belgaum) आगाराला आता पुन्हा अजब आदेशांचा आर्थिक फटका बसणार आहे. कोरोना विषाणुच्या नव्या डेल्टा (Delta Plus) संसर्गामुळे महाराष्ट्रातील (Maharashtra) कोल्हापूर,(Kolhapur) सातारा (Satara) आणि अन्य कांही जिल्ह्यात निर्बंध लागू केल्यामुळे कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात जाणाऱ्या बस सेवा (Bus services) बंद करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान मुंबई, पुणे आणि ईतर जिल्ह्यातील बससेवा सुरु आहेत. (Bus services from Belgaum to Kolhapur and Satara have stopped)

भारतामध्ये सर्वात जास्त महाराष्ट्र राज्यात डेल्टा प्लस रूग्ण विषाणूचे रूग्ण आढळले. या संसर्गामुळे कर्नाटकने बेळगावातून कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याकडे जाणारी बससेवा काल सोमवारपासून बंद करण्यात आली आहे. वायव्य कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाने येणाऱ्या काळात खबरदारी म्हणून कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याची बस सेवा बंद केली आहे.

कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे लोकं घाबरून गेले आहेत. नवीन डेल्टा प्रकार सर्वात वेगवान पसरणारा व्हायरस आहे असे WHO ने सांगितले आहे. अशा परिस्थितीत शासन आणि प्रशासनाने लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. कोविड विषाणूच्या दुसऱ्या लाटेतून लोकं सावरत असतानाच कोविडच्या नव्या डेल्टा प्लस व्हेरियंटने भारतात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. हा नवीन डेल्टा प्लस व्हायरस महाराष्ट्रात झपाट्याने पसरत आहे. नवीन डेल्टा प्लसचे बरेच रूग्ण महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब आणि मध्य प्रदेशात आढळले आहेत. अशा परिस्थितीत लोकांमध्ये एकामागून एक संकट आल्याने भितीचं वातावरण निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.माथे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Video Viral: मडगावच्या दहीहंडीत आला 'पुष्पा'! "झुकेगा नही" म्हणत त्याने काय केलं, बघा...

Opinion: 3500 ईसापूर्व काळात सुमेरियन लोकांनी ‘क्यूनिफॉर्म’ लिपी विकसित केली, छापखान्याच्या शोधामुळे वाचनकलेत क्रांती झाली

Goa Live News: मोर्ले सत्तरी येथील वासू मोरजकर यांचे मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान

Vijayanagar Empire: राजा हरिहरच्या आदेशाने, बहामनी सल्तनतीकडून गोवा जिंकले; राजा अच्युतदेवरायाचा दुर्लक्षित इतिहास

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

SCROLL FOR NEXT