रायगड - महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली आहे. रायगड जिल्ह्यातील (Raigad district) पर्यटनस्थळ (Tourist destination) म्हणून माथेरान प्रसिद्ध आहे. येथील बऱ्याच लोकांचे लसीकरण (Vaccination) पूर्ण झाले आहेत. येथील नागरिकांचे फक्त पर्यटन क्षेत्रावर (Tourist area) संपूर्ण जीवनमान अवलंबून आहे. यामुळे रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आजपासून माथेरान पर्यटनासाठी अनलॉक (Unlock) करण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे लॉकडाऊनमध्ये अनेक लोक घरी राहून बोर झाले आहेत. परंतु आता पर्यटकांना बिनधास्तपने माथेरानच्या सान्निध्यात भटकंती करता येणार आहे. येथे पर्यटकांच्या आगमनामुळे येथील सर्वसामान्य नागरिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. येथील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
माहमारीमुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले होते . त्यामुळे पर्यटन क्षेत्रावर संपूर्णत: पोट असणाऱ्या माथेरानमधील नागरिकांचेआर्थिकचक्र पूर्णता: कोलमडले आहे. अतिशय सामान्य जीवन जगणारे नागरिक पूर्णपणे हतबल झाले आहे. येथील पर्यटन सुरु झाल्यामुळे सर्वांच्या उपजीविकेचा प्रश्न सुटणार आहे. लॉकडाउनमुळे येथील नागरिकांचा रोजगार पूर्णपणे ठप्प झाला होता. परंतु, अनलॉक झाल्यामुळे चांगल्या प्रकारे रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच नगरिकांनीसुद्धा शासनाने लागू केलेल्या सर्व नियम आणि अटींचे पालन करणे आवश्यक आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.