Aurangabad News Dainik Gomantak
महाराष्ट्र

Aurangabad News: स्वत:ला पेटवून प्रेयसीला मारली मिठी, मराठवाडा विद्यापीठ परिसरातील धक्कादायक घटना

दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Pramod Yadav

Aurangabad News: प्रियकराने स्वत: ला पेटवून घेत प्रेयसीला मिठी मारल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यात घडली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मराठवाडा विद्यापीठात झुलॉजी विभागातील गजानन मुंडे आणि पूजा साळवे हे दोघेही संशोधक विद्यार्थी आहेत. दोघेही शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान संस्था कॉलेजमध्ये आले होते, त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर प्रियकर गजानन मुंडे याने अंगावर पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवून घेत, प्रेयसीला मिठी मारली. या घटनेमध्ये दोघे गंभीररित्या गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांवर शासकीय रुग्णालय घाटी येथे उपचार सुरू आहेत. पोलीस अधिक तपास करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Dairy: गोवा डेअरीचे हायफॅट दूध महागले! नाताळ तोंडावर असताना दरवाढ; गोपनियतेमुळे उलटसुलट चर्चा

Goa Nightclub Fire: पार्टी सुरू असताना मृत्यूचा तांडव! 25 मृत्यू, 3 पर्यटकांचा समावेश; 'सिलेंडर स्फोटा'मुळे नाईट क्लबला आग?

Lonavala Accident: ‘शो’ ठरला अखेरचा, गोव्यातील 2 मित्र लोणावळ्यातील अपघातात ठार; बार्देश शोकाकुल

Goa nightclub fire: गोव्यातील नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीत 23 जणांचा मृत्यू, हडफडेच्या रोमिओ लेनमध्ये घडली घटना

Indigo Flights Cancelled: इंडिगोची पुन्हा 14 उड्डाणे रद्द! दाबोळीवर प्रवाशांचे हाल; पर्यटन हंगामावरही परिणाम

SCROLL FOR NEXT