Shraddha Walkar Murder Case: देशभर गाजत असलेल्या श्रद्धा वालकर प्रकरणातील मुख्य आरोपी आफताब आमिन पुनावाला याची नार्को टेस्ट केली जाणार आहे. आज (दि.21) आफताबची नार्को टेस्ट केली जाणार होती मात्र, ती रद्द करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
आफताबने श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून जंगलात फेकून दिले. आफताब वारंवार आपली विधाने बदलत असून, पोलिसांची दिशाभूल करत आहे. दरम्यान, आफताबच्या नार्को टेस्टची मागणी होत असून, नार्को टेस्ट म्हणजे काय, आणि ती कशी केली जाते? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
नार्को टेस्ट म्हणजे काय? (What Is A Narco Test?)
एखाद्या आरोपींकडून सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी नार्को टेस्टची मदत घेतली जाते. फॉरेन्सिक तज्ञ, तपास अधिकारी, डॉक्टर आणि मानसशास्त्रज्ञ यांच्या उपस्थितीत ही चाचणी केली जाते. नार्को चाचणीसाठी आरोपीला काही औषधे दिली जातात, ज्यामुळे त्याचे जागृत मन सुस्त अवस्थेत जातं. त्यानंतर आरोपीच्या कानावर पडणाऱ्या गोष्टींविषयी विचार करुन उत्तर देण्याचे त्याचे कौशल्य कमी होते. तर, काही प्रकरणांमध्ये आरोपी बेशुद्धावस्थेत देखील जातो.
नार्को टेस्ट कशी केली जाते? (How Narco Test is Done)
नार्को टेस्टमध्ये आरोपीला सोडियम पेंटोथॉलचे एक इंजेक्शन दिले जातं. या औषधाला ट्रुथ ड्रग म्हणूनही ओळखले जातं. या औषधामुळे आरोपी पूर्णतः शुद्धीतही असत नाही किंवा बेशुद्धही होत नाही. या स्थितीत व्यक्ती खोटं बोलत नाही. त्यामुळे तपास पथकाला वस्तुस्थितीपर्यंत पोहोचण्यास मदत मिळते. परंतु नार्को टेस्टमध्ये आरोपी प्रत्येक वेळी सत्य सांगतात आणि प्रकरण सोडवले जाईल असे होत नाही.
नार्को टेस्ट किती खरी असते? (How Useful Narco Test Is)
नार्को टेस्ट करण्याआधी सदर व्यक्तीला नार्को टेस्ट बद्दल सगळी माहिती देणं बंधनकारक असते, तसेच, टेस्ट करण्यासाठी कोर्टाची परवानगी देखील लागते. नार्को टेस्ट शंभर टक्के खरी असेल याची खात्री देता येत नाही. अनेकदा आरोपीच्या चलाखीमुळे नार्को टेस्ट निरुपयोगी ठरतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.