Besharam Song Controversy | Pathan Controversy| Besharam Song Dainik Gomantak
महाराष्ट्र

Besharam Song Controversy : 'बेशरम रंग'वर भाजप नेते राम कदमांची टीका; म्हणाले, 'महाराष्ट्रात चित्रपट चालू देणार नाही'

हिंदुत्वाचा अपमान करणारा कोणताही चित्रपट किंवा मालिका महाराष्ट्रात येऊ दिली जाणार नाही, अशा इशारा त्यांनी दिला आहे.

दैनिक गोमन्तक

Pathan Controversy : मध्य प्रदेश सरकारनंतर महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजपच्या एका नेत्यानेही शाहरुख खान-दीपिका पदुकोणचा आगामी चित्रपट पठाण हा 'हिंदुत्वाचा अपमान करणारा' असून त्याला परवानगी दिली जाणार नाही, असे म्हटले आहे.

आज ट्विटमध्ये भाजप आमदार राम कदम यांनी लिहिले की, 'हिंदुत्वाचा अपमान करणारा कोणताही चित्रपट किंवा मालिका महाराष्ट्रात येऊ दिली जाणार नाही.' (Besharam Song Controversy)

हिंदी चित्रपटसृष्टीचे माहेरघर असलेल्या महाराष्ट्रात ‘हिंदुत्व विचारसरणीचे सरकार’ असल्याने चित्रपटाच्या निर्मात्याने आणि दिग्दर्शकाने संत, महात्मा, हिंदू संघटना आणि सोशल मीडियावरील करोडो लोकांसमोर स्वत:चे स्पष्टीकरण द्यावे’ अशी मागणी त्यांनी केली आहे.

शाहरुख खानने त्याच्या चित्रपटातील गाण्यावरून झालेल्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. कोलकाता येथे एका कार्यक्रमादरम्यान तो म्हणाला की, जग काहीही बोलो, माझ्यासारखे लोक नेहमीच सकारात्मक राहतील. सोशल मीडियावर मतांची व्याप्ती खूपच कमी आहे. सोशल मीडियाच्या वापरामुळे नकारात्मकता वाढते असे मी कुठेतरी वाचले आहे. त्यामुळे भेदभाव आणि विभाजनाची प्रवृत्तीही वाढते, असे तो पुढे म्हणाला.

भाजप नेत्यांसह निदर्शने करणाऱ्यांपैकी अनेकांनी हिंदू अभिनेत्री आणि मुस्लिम अभिनेत्याच्या जोडीकडे आणि 'बेशरम रंग' गाण्यातील त्यांच्या भगवा आणि हिरव्या पोशाखाकडे बोट दाखवत आरोप केले आहेत. त्यांनी चित्रपटावर तसेच संपूर्ण बॉलिवूडवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.

शाहरुख खानचे पुतळे जाळणाऱ्या मध्य प्रदेशातील इंदूरसारख्या ठिकाणी निदर्शने होत असताना चित्रपटाच्या निर्मात्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: महाराष्ट्रात मिळालेलं यश अभूतपूर्व आहे - सुलक्षणा सावंत

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT