Rahul Narvekar Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra: कोण आहेत राहुल नार्वेकर? विधानसभा सभापती पदासाठी भरला अर्ज

महाराष्ट्र भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांनी शुक्रवारी विधानसभेच्या नवीन सभापती पदासाठी उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे.

दैनिक गोमन्तक

Maharashtra Politics: महाराष्ट्र भाजपचे आमदार राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी शुक्रवारी विधानसभेच्या नवीन सभापती पदासाठी उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. रविवारी सभापतीपदासाठी मतदान होणार आहे. गेल्या वर्षी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर सभापती पद रिक्त झाले होते. उपसभापती नरहरी झिरवाळ हे काळजीवाहू सभापती म्हणून काम पाहत होते. नार्वेकर यांचा शिवसेना आणि राष्ट्रवादीशी जवळचा संबंध आहे. नार्वेकर हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निबांळकर यांचे जावई आहेत, जे सध्या महाराष्ट्र विधान परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. (bjp mla rahul narvekar link with shiv sena and ncp who will be the new speaker of maharashtra)

दरम्यान, राहुल नार्वेकर हे मुंबईतील कुलाबा मतदारसंघातील भाजपचे (BJP) विद्यमान आमदार आहेत. ते यापूर्वी शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी (NCP) संबंधित होते. चला तर मग जाणून घेऊया राहुल नार्वेकर यांच्याबद्दल...

राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक यांचे जावई

राहुल नार्वेकर यांचा जन्म दक्षिण मुंबईतील कुलाबा परिसरात झाला. त्यांचे बंधू मकरंद कुलाब्यातून नगरसेवक आहेत. नार्वेकर हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांचे जावई आहेत, जे राष्ट्रवादीचे आमदार आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती आहेत.

शिवसेनेचे युवा प्रवक्ते

राहुल नार्वेकर हे सुरुवातीच्या काळात शिवसेनेच्या युवा शाखेचे प्रवक्ते होते. 2014 मध्ये त्यांनी पक्ष सोडला आणि राष्ट्रवादीत प्रवेश केला. पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमुळे आपल्याला शिवसेना सोडावी लागली, असा दावा नार्वेकर यांनी केला. राहुल नार्वेकर यांनी 2014 ची लोकसभा निवडणूक मावळ मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, त्यात त्यांचा शिवसेनेच्या श्रीरंग आप्पा बारणे यांच्याकडून पराभव झाला होता.

2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला

2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी नार्वेकर यांनी कुलाबा येथून भाजपमध्ये प्रवेश केला होता. कुलाब्यातून त्यांनी काँग्रेसचे अशोक जगताप यांचा पराभव करुन विधानसभा निवडणूक जिंकली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT