Ganesh Naik Dainik Gomantak
महाराष्ट्र

भाजप आमदाराच्या वाढल्या अडचणी, महिलेला जीवे मारण्याचं प्रकरणं आलं अंगलट

नवी मुंबईतील ऐरोलीचे भाजपा आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दैनिक गोमन्तक

नवी मुंबईतील ऐरोलीचे भाजपा (BJP) आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (BJP MLA Ganesh Naiks problems increased the case of threatening to kill a woman was revealed)

2021 मध्ये गणेश नाईक यांनी आपल्यावर बंदूक रोखून जीवे मारण्याची धमकी दिली होती, असा आरोप या महिलेने केला आहे. मी गणेश नाईक यांच्यासोबत 27 वर्षांपासून लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत आहे आणि आम्हाला एक मुलगा देखील या संबंधामुळे झाली आहे, या मुलास त्याच्या वडिलांचं नाव दिलं जावं अशी मागणी मी त्यांच्याकडे केली होती, मात्र गणेश नाईक यांनी मला बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप संबंधित महिलेने केला आहे.

आता याच प्रकरणात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय या महिलेकडून राज्य महिला आयोगाकडे देखील तक्रार करण्यात आली आहे. तर, या प्रकरणी गणेश नाईक यांनी स्वत:ची डीएनए चाचणी करून यावर स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केली.

माजी मंत्री व ऐरोली विधानसभेतील भाजपाचे आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सन 1993 पासून गणेश नाईक यांनी एका महिलेला लग्नाचे आमिष देवून जीवे मारण्याची धमकी देवून तिचे लैंगिक शोषण करीत असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला असून यासंदर्भातील माहिती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT