मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. यामुळे आता शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. या वादात आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उडी घेतली आहे. ईडीच्या कारवाईनंतर राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना ‘आगे आगे देखो होता है क्या’ असं म्हणत इशारा दिला आहे.
आगे आगे देखिए होता है क्या! महाराष्ट्रात भ्रष्टाचाराने कळस गाठलाय. जनतेचे शोषण होत आहे. सूडबुद्धीने कारवाया होत आहेत. यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. सव्वा दोन वर्षांत महाराष्ट्राच्या (Maharashtra) शेतकऱ्यांना, एसटी कर्मचाऱ्यांना काय मिळाले? त्यांच्या नशिबी आत्महत्या! आप्तांच्या तिजोऱ्यांमध्ये मात्र कोट्यवधींची भर. ही संपत्ती कुठून आली? कोणाकडून आणली? शिवसैनिकांच्या वाट्याला यातील काहीही नाही. सत्ता फक्त आपण आणि आपल्या नातेवाईकांसाठीच!, असे ट्वीट करत राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका केली आहे.
मोठ्या राणेंच्या पाठोपाठ छोट्या राणेंनीही मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. नितेश राणे (Nitesh Rane) यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ते म्हणतात, थेट मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांवर ही कारवाई झाली आहे. आता मुख्यमंत्री कशासाठी थांबलेत, त्यांनी राजीनामा द्यावा. आतापर्यंत आम्ही सगळीकडे त्यांचं नाव ऐकत होतो. ते आता सिद्ध झालं आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.