Chitra Wagh dainik gomantak
महाराष्ट्र

Chitra Wagh : चित्रा वाघ यांच्या कोल्हापुरातील सभेवर दगडफेक; ट्वीट करत म्हणाल्या...

कोल्हापूरात चित्रा वाघ यांच्या सभेवर दगडफेक, म्हणाल्या 'तुमची दहशत गुंड बलात्काऱ्यांना दाखवा'

दैनिक गोमन्तक

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजपनं कोल्हापूरची ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून प्रचारासाठी भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ कोल्हापूरमध्ये आल्या होत्या. त्या भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम यांच्या प्रचारार्थ सभेत आल्या होत्या. यावेळी यांच्या प्रचार सभेत अज्ञातांतकडून दगडफेक करण्यात आल्याचा दावा त्यांनी ट्वीटवर केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे कोल्हापूरमध्ये खळबळ उडाली आहे. (BJP leader Chitra Wagh’s meeting stoned)

कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या (Kolhapur by-election) निमित्ताने भाजपच्या (BJP) महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ या कोल्हापूरात आल्या होत्या. त्यांची मुक्तसैनिक वसाहत इथं रात्री सभा सुरू पार पडली. यासभेत अज्ञातांतकडून दगडफेक करण्यात आल्याचा दावा वाघ यांनी ट्विटर करून याबद्दल माहिती दिली.

यावेळी वाघ यांनी ट्विट करत, 'वा रे बहादुरांनो, समोर यायची हिंमत नाही म्हणून सभेत दगडे (Stone) मारता का? 'तुमची दहशत गुंड बलात्काऱ्यांना दाखवा असल्या थेऱ्यांना घाबरणारी चित्रा वाघ नाही' असं लिहीत त्यांनी हा प्रकार करणाऱ्यांना इशारा दिला.

दरम्यान सभेवर दगडफेक करण्यासंदर्भात पोलिसांमध्ये (Police) कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही. पण, चित्रा वाघ यांच्या आरोपांमुळे कोल्हापुरात खळबळ उडाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT