भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कोल्हापुरात बोचरी टीका केली. कोल्हापुरातल्या महाविकास आघाडी नेत्यांची डबल ढोलकी असते, असे ते म्हणाले. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पाटील कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. दरम्यान त्यांच्या हस्ते भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. (BJP leader Chandrakant Patil criticizes leaders of Mahavikas Aghadi government)
चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली. ते म्हणाले, “जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांची नेहमी डबल ढोलकी असते. जिल्हा परिषदेची निवडणूक (Election) आली की शहरात येणार नाही म्हणून सांगतात आणि पालिकेची निवडणूक आली की हद्दवाढीची मागणी करतात. हरण्याची स्थिती आल्याने रोज नवी घोषणा चालली आहे. हिंमत असेल तर पाच गावांची हद्दवाढ कराच. बघा येतात की नाही अंगावर.”
चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) पुढे म्हणाले, ”हद्द वाढ करण्यास गावांचा विरोध असल्याने शेवटी देवेंद्र फडणवीसांनी कंटाळून प्राधिकरण दिलं. कधी तरी ही गावं शहरात येतील, तसेच या प्राधिकरणातून गावांचा विकास होईल या हेतूने फडणवीसांनी प्राधिकरण दिलं होतं. पण दोन वर्षात प्राधिकरणाची वाट लावण्यात आली आहे. ”
कोल्हापूर (Kolhapur) उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे. इथं कॉंग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढाई होणार असे चित्र दिसत आहे. येत्या 12 एप्रिल रोजी या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर18 एप्रिल निकालाचा दिवस आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.