Goa CM Pramod Sawant  Dainik Gomantak
महाराष्ट्र

CM Pramod Sawant: मुख्यमंत्री प्रमोद सावंत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपचे स्टार प्रचारक; 40 दिग्गजांची यादी जाहीर!

Maharashtra Assembly Elections: महाराष्ट्रात सध्या विधनसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. यातच आज (26 ऑक्टोबर) भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

Manish Jadhav

महाराष्ट्रात सध्या विधनसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. यातच आज (26 ऑक्टोबर) भाजपकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. राज्‍यात प्रचार करण्‍यासाठी 40 स्‍टार प्रचारक फिरणार आहेत. त्‍यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्‍यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा यांच्‍यासह गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नावाचा देखील समावेश आहे.

भाजपचा नारा

दरम्यान, गेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अबकी बार 400 पारचा नारा दिला होता. परंतु विधानसभा निवडणुकीसाठी अद्याप भाजपने कोणताही नारा रेटला नाहीये. प्रचाराला सुरुवात झालेली नाहीये. प्रचार सुरु होताच मुद्दे आणि प्रत्येक पक्षांचे नारे देखील समोर येतील.

दिवाळीनंतर पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्रात सभा

पंतप्रधान मोदी दिवाळीनंतर महाराष्ट्रात भव्य सभा घेण्याची तयारी करत आहेत. 5 ते 14 नोव्हेंबर दरम्यान पीएम मोदी महायुतीसाठी मते मागणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुमारे 8 दिवस महाराष्ट्रात अनेक निवडणूक सभा घेणार आहेत. पंतप्रधान मोदी केवळ भाजपचाच नव्हे तर महायुतीच्या उमेदवारांचाही प्रचार करणार आहेत.

भाजपनं मुख्यमंत्र्यांना उतरवलं निवडणुकीच्या मैदानात

भाजपच्या स्टार प्रचारकांमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricket Fights: कधी बॅट उगारली, तर कधी शिवीगाळ! 2025 मध्ये खेळापेक्षा राड्यांचीच जास्त चर्चा, कसोटी क्रिकेटमधील 10 मोठे वाद

Goa Drugs Seized: ड्रग्जमुक्त गोव्याकडे पाऊल; वर्षभरात 78 कोटींचे अंमली पदार्थ जप्त!

चिंबलमध्ये न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन? 'युनिटी मॉल'चे काम सुरूच असल्याचा ग्रामस्थांचा आरोप; उद्यापासून उपोषण

Goa Crime: नाक दाबले अन् जीव घेतला... डिचोलीतील 'त्या' महिलेचा मृत्यू नव्हे, तर खूनच! आरोपीकडून गुन्ह्याची कबुली

World Cup 2026 Squad: अंडर-19 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा; कोणत्या खेळाडूंना मिळाली जागा? बघा संपूर्ण संघ

SCROLL FOR NEXT