Maharashtra Politics Dainik Gomantak
महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule: शिंदे गटाशी युती करणार, विधानसभेच्या 200 जागा जिंकणार ; बावनकुळेंचा दावा

Maharashtra Politics: 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिंदे एकत्र लढणार का? याबाबत महाराष्ट्र भाजप अध्यक्षांनी विधान केले आहे.

दैनिक गोमन्तक

देशात होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा 2024 च्या निवडणुकांबाबत महाराष्ट्र भाजप प्रमुखांनी विधान केलं आहे. भाजप आणि शिंदे एकत्र लढणार का? महाराष्ट्र भाजपच्या अध्यक्षांनी याबाबत विधान केले आहे. महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, भाजप 2024 मध्ये विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना युतीसह लढवेल. आम्ही लोकसभेच्या 45 आणि विधानसभेच्या 200 हून अधिक जागा जिंकण्यासाठी तयार आहोत, असा दावा त्यांनी केला. 

दरम्यान, भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचे आरोप केले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांना माझी विनंती आहे की, त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचं निलंबन करावं, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

राष्ट्रवादीत नैतिकता असेल तर राष्ट्रवादीने बावनकुळे यांचं निलंबन करायलाच हवं. अशा घटना होत राहतात असं बोलून चालणार नाही. आव्हाडांना आमदारकीचा राजीनामा द्यायचा असेल तर त्यांनी तो द्यावा. अजित पवार आणि शरद पवार आव्हाडांचा राजीनामा घेणार का?, असा सवाल त्यांनी केलाय. कुणी आव्हाड यांचं समर्थन करत असेल तर त्यांना पण गुन्ह्यात घ्यायला हवं, असंही बावनकुळे म्हणालेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT